“..तर महाराष्ट्राचा पुढला मुख्यमंत्री मीच”; ठाकरे-फडणवीस वादावर आठवलेंचं मिश्किल भाष्य

“..तर महाराष्ट्राचा पुढला मुख्यमंत्री मीच”; ठाकरे-फडणवीस वादावर आठवलेंचं मिश्किल भाष्य

Ramdas Athawale Press Conference : राज्याच्या राजकारणात उद्वव ठाकरेंच्या एका वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. राजकारणात एक तर ते तरी राहतील नाहीतर मी तरी राहिल अशा शब्दांत ठाकरेंनी फडणवीसांना ललकारलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर फडणवीसांनी योग्य वेळी उत्तर देऊ इतकीच प्रतिक्रिया दिली असली तरी भाजप नेते ठाकरेंवर तुटून पडले आहेत. त्यांनीही ठाकरेंना तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. यानंतर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील वाद लवकर मिटला नाही तर राज्याचा पुढला मुख्यमंत्री मीच असेन असे मिश्किल उत्तर मंत्री आठवले यांनी दिले.

मंत्री रामदास आठवले आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणतात एक तर ते राहतील किंवा फडणवीस राहतील माझी दोघांनाही विनंती आहे राजकारणामध्ये दोघांनी राहायला हवं. दोघेही माझे चांगले मित्र आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोडलं नाही एकनाथ शिंदे हे स्वतः नाराज होते.

उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री बनण्याच्या वेळेस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला हवं होतं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं असता तर ते कदाचित बाहेर पडले नसते. एकनाथ शिंदे हे स्वतः आमच्यासोबत आले आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोडलं ही जी चीड उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे त्यांनी ती काढून टाकावी. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मैत्री होती ती पुन्हा एकदा व्हावी अशी आमची इच्छा आहे.

एकतर तू तरी राहशील नाहीतर मी.. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थेट ललकारलंच

अण्णाभाऊंना भारतरत्न द्या

अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे ही मागणी मी संसदेत केलेली आहे. तसं पत्रही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलं आहे. महात्मा जोतिबा फुले आणि आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी केली आहे. आता या संदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून राज्य सरकारच्यावतीने ही मागणी केली पाहिजे. राज्य सरकारची शिफारस मिळाल्यानंतरच भारतरत्नबाबत विचार होत असतो त्यामुळे राज्य सरकारने शिफारस करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.

फडणवीस अध्यक्ष झाले तर आनंदच

देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशा चर्चा सुरू आहेत. यावरही आठवलेंनी भाष्य केलं. याआधी नितीन गडकरींचा नंबर लागला होता. महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे त्यांना कुणाला तरी राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या आधी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं आहे त्यांचा चेहरा विश्वासक आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तरी ते महाराष्ट्रमध्ये असणारच आहेत त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली तर आनंदाची गोष्ट आहे. देवेंद्र फडणीस राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर भाजप अजून मजबूत होईल असेही मंत्री आठवले म्हणाले.

राज ठाकरेंच्या मागण्या अन् आठवलेंच्या कवितांनी गाजवली मोदींची मुंबईतील सभा; पाहा फोटो 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube