Video : तुझ्याशी बोलतो थांब; पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची साद घालणाऱ्याला दादांचं उत्तर
पुणे : राष्ट्रावादीत उभी फुट पडल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांची आजही अजित पवारांनी (Ajit Pawar) पुन्हा शरद पवारांकडे (Sharad Pawar) परत यावे अशी इच्छा आहे. यासाठी अनेकजण अजितदादांना विनंती करत असतात. पण अद्याप या कार्यकर्त्यांच्या मागणीला यश आलेले नाही. आज असाच अनुभव अजितदादांच्या मावळ येथील मेळाव्यात आला. यावेळी अजितदादांनी दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. (AJit Pawar Jan Sanman Speech In Maval)
Ajit Pawar : शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का? अजितदादांनी दिलं हे उत्तर
नेमकं काय घडलं?
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी अजितदादांनी कंबर कसली आहे. सरकारच्या योजना तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादीकडून जन सन्मान योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. आज ही यात्रा मावळमध्ये होती. यावेळी अजित पवारांना उपस्थिताना संबोधित करण्यासाठी उभे राहिले. याचवेळी उपस्थितांमधील एका कार्यकर्त्या जीव तोडून अजितदादांना हाका मारत होता. त्यावेळी त्याच्या हातात एक फ्लेक्स होता. ज्यावर आपल्या राष्ट्रवादीत परत या अशी भावनिक साद घालण्यात आली. नंतर हा फ्लेक्स संबंधित कार्यकर्त्याच्या हातून ओढून घेण्यात आला.
अजितदादांच्या ‘गुलाबी’ जॅकटवरून पॉलिटिक्स; पण रंग नेमका कोणता?; दादांनी उदाहरणासह सांगितलं!
अजितदादांना साद घालणारा कार्यकर्ता कोण?
या सर्व घडोमोडींनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना संबंधित कार्यकर्त्याने सांगितले की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी पुणे जिल्हाध्यक्ष होतो. दोन राष्ट्रवादी निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्या कोणत्याही राजकीय मंचावर जाण्यास नकार देत आहे. नेमकं अजितदादांकडे जायचं की पवारांकडे असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात असल्याच्या भावना त्याने बोलताना व्यक्त केल्या.
हिंजवडी, चाकण, तळेगाव यासह अन्य एमआयडीसी आणण्याचे काम अजितदादा आणि पवार साहेबांनी केल्याचे तो म्हणाला. त्यामुळे येथून पुढच्या काळामध्ये आम्हाला दादा आणि साहेब दोन्ही आम्हाला हवे आहेत. एवढेच नव्हे तर, पुणे जिल्ह्यासाठी आम्हाला पवार कुटुंबिचं आम्हाला हवे आहे. दादांना भेटून त्यांना भावनिक आवाहन करणार असल्याचेही यावेळी या कार्यकर्त्याने सांगितले.
Video : पत्रकार परिषदेत ‘गुलाबी जॅकेट’वर प्रश्न; गुगली टाकत पवारांकडून अजितदादा ‘बोल्ड’
अन् अजितदादांनी सांगितले तुझ्याशी बोलतो
हा सर्व प्रकार घडत असताना मागे बसलेले सुनिल शेळके संबंधित कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी हातवारे करताना दिसले. त्याचवेळी अजितदादांनी त्यांचे भाषण थोडं थांबवत जीव तोडून हाका मारणाऱ्या कार्यकर्त्याला अरे जाऊ दे रे म्हणत तुझ्याशी बोलतो थांब असे उत्तर दिले. त्यामुळे आता अजितदादा या कार्यकर्त्याला खरंच भेटतात का? आणि त्याचं म्हणण ऐकून घेतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.