Video : ‘ते’ सूत्र माझ्या हातात सापडू द्या, पुरेपूर बंदोबस्तचं करतो; एवढचं काय जीवन….
पुणे : शेतकरी कर्जमाफीला विरोध करणाऱ्या बातमीवरून अजितदादांचा आवाज काहीसा वाढलेला दिसला. यावेळी अजितदादांनी त्यांच्या स्टाईलने सूत्रांच्या हवाल्याने बातम्या देणाऱ्या पत्रकारांचाही समाचार घेतला. यावेळी दादांनी हे सूत्र मला एकदा पाहायचेच आहेत, मी म्हणतो सूत्रांना एखादा जीवन गौरव पुरस्कार देऊनच टाका. हे सूत्र माझ्या हातात सापडू द्या, त्याचा पुरेपूर बंदोबस्त करतो असा दमही अजित पवारांनी (Ajit Pawar) भरला. ते पुण्यात बोलत होते.
त्याचा तर सत्कारचं केला पाहिजे; अजितदादांच्या भाषणात कायदे तज्ज्ञ खळखळून हसले
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
शेतकऱ्यांच्या (Farmer) कर्ज माफीला तुम्ही विरोध केल्याचे वृत्त समोर आले होते असा प्रश्न दादांना विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकताच अजितदादांचा आवाज काहीसा वाढला. ते म्हणाले की, कर्जमाफीबाबत चुकीची बातमी दिली गेली कर्जमाफी देऊ नका असं मी कधीच म्हणणार नाही. कारण आम्ही शेतकरी आहोत. ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत होईल अशा सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्यामुळे ही बातमी धादांत खोटी असल्याचे म्हणत हे सूत्र मला एकदा पाहायचेच आहेत, मी म्हणतो सूत्रांना एखादा जीवन गौरव पुरस्कार देऊनच टाका. हे सूत्र माझ्या हातात सापडू द्या, त्याचा पुरेपूर बंदोबस्त करतो, असे म्हणत उगीच चुकीच्या बातम्या लावल्या जातात असे अजित पवार म्हणाले.
ड्रग्स कनेक्शनमध्ये नाव? तब्बल 25 वर्षानंतर भारतात परतली…कुंभमेळ्यात ममताने घेतला संन्यास
यावेळी दादांनी एसटीच्या भाडेवाढीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, एसटीच्या जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन चांगली सुविधा ग्रामीण आणि शहरी भागात देण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे भाडेवाढ करणे आवश्यक असून चर्चा सुरू आहे. अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री आज पहाटेच परदेशातून आलेले आहेत. त्यांच्या कानावर घालूनच अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विचारुनच पुढील निर्णय होईल. एसटी महामंडळ व्यवस्थित चाललं पाहिजे आणि जनतेचा त्रास कमी झाला पाहिजे यासाठी मध्यममार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून एसटीच्या भाडेवाढी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.