Video : पत्रकार परिषदेत ‘गुलाबी जॅकेट’वर प्रश्न; गुगली टाकत पवारांकडून अजितदादा ‘बोल्ड’

  • Written By: Published:
Video : पत्रकार परिषदेत ‘गुलाबी जॅकेट’वर प्रश्न; गुगली टाकत पवारांकडून अजितदादा ‘बोल्ड’

पुणे : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर बघता अजित पवारांकडून (Ajit Pawar) राज्यभर जन सन्मान यात्रा काढली जात आहेत. या यात्रेदरम्यान अजित पवार गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केलेले दिसून येत आहेत. या जॅकेटची आणि त्यांच्या ताफ्यात असलेल्या गुलाबी रंगाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या गुलाबी रंगावर शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांच्या प्रतिक्रिया देत अजितदादांना जोरदार टोला लगवला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sharad Pawar On Ajit Pawar Pink Jacket)

‘शरद पवारांचा राज ठाकरेंवर जोरदार पलटवार’; म्हणाले, मी या रस्त्याने कधी जात नाही, मला महाराष्ट्र…

अन् गुलाबी जॅकेटवर पवारांनी घेतली फिरकी

पत्रकार परिषदेला संबोधित करतना शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली. त्याचवेळी एका पत्रकाराने पवारांना गुलाबी जॅकेट, गुलाबी बॅनर, गुलाबी गाडी आणि माहोल गुलाबी करुन ते सध्या लाडकी बहीण योजनेबाबत सर्वत्र जागृती करत आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना या गुलाबी रंगाचा फायदा होईल का? विधानसभेला महिला वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होईल का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारला. त्यावर पवारांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारची फिरकी घेत अजितदादांती विकेट घेतली.

Video : उद्भवलेली समस्या सोडवायची असेल तर, धोरण बदला; पवारांची मोदींकडे मोठी मागणी

तुमच्याकडे महिला आकर्षित होती का?

अजित पवारांच्या गुलाबी जॅकेट आणि रंगाबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. त्याने पवारांना प्रश्न विचारताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या स्टाईलने तुम्ही निळ्या रंगाचा शर्ट घातल्याने तुमच्याकडे महिला आकर्षित होतील का? असा प्रतिप्रश्न अजित पवारांचे नाव न घेता विचारला. यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. एकूणचं काय तर, पवारांच्या या उत्तरानंतर अजित पवारांनी कितीही रंगाचे जॅकेट घातले तरी त्यांना विधानसभेत मतदारांना आकर्षित करण्यात यश येणार नाही असेच संकेत पवारांनी दिले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube