Asia Cup 2023: ACC ने पाकिस्तानच्या क्रीडा मंत्र्यांला झापले, PCB ची अंतर्गत समस्या ही आमची समस्या नव्हे…
आशिया कप 2023 चे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाऊ शकते. मात्र BCCI आणि PCB यांच्यात वाद सुरूच आहे. खरे तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला हायब्रीड मॉडेल सुचवले होते. या मॉडेल अंतर्गत ही स्पर्धा पाकिस्तानात होणार होती, पण टीम इंडिया तटस्थ ठिकाणी खेळली असती. मात्र, आता पाकिस्ताननेच आपल्याच शब्दावर यू-टर्न घेतल्याचे दिसत आहे. नुकतेच पाकिस्तानचे क्रीडा मंत्री अहसान मजारी यांनी मोठे वक्तव्य केले होते. (Asian Cricket Council Reaction On Pakistan Minister Ehsan Mazari Over Asia Cup Remark Ind vs Pak)
काय म्हणाले होते पाकिस्तानचे क्रीडा मंत्री अहसान मजारी?
पाकिस्तानचे क्रीडा मंत्री अहसान मजारी म्हणाले होते की, पाकिस्तान आशिया चषक 2023 चे यजमान असल्याने स्पर्धेचे सर्व सामने पाकिस्तानच्या भूमीवर खेळले जावेत. तसेच त्यांनी हायब्रीड मॉडेल नाकारल्याचे सांगितले. याशिवाय, जर भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात आला नाही, तर पाकिस्तानी संघ एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाणार नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, आता आशियाई क्रिकेट परिषदेने अहसान मजारीला प्रत्युत्तर दिले आहे.
अजितदादा फरफटत जाणार नाहीत, योग्यवेळी ताकद दाखवतील; रोहित पवारांचे सूचक विधान…
‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची अंतर्गत समस्या काय आहे, ती आमची समस्या नाही’
आशियाई क्रिकेट परिषदेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अंतर्गत मुद्दा काय आहे, ही आमची समस्या नाही. ते म्हणाले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेच हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव दिला होता. परंतु त्यांनी पुन्हा यू-टर्न घेतला. त्याचवेळी ते म्हणाले की, मी पाकिस्तानचे क्रीडा मंत्री अहसान मजारी यांना आठवण करून देऊ इच्छितो की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृत प्रेस जारी करून हायब्रीड मॉडेल स्वीकारले होते. यादरम्यान, पीसीबीने अधिकृतपणे सांगितले होते की आशिया चषकाचे 4 सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील, तर उर्वरित सामने श्रीलंका खेळतील.