Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये मराठमोळ्या ओजस- ज्योतीचा ‘सुवर्णवेध’
Ojas Deotale And Jyothi Vennam : सध्या एशियन गेम्स 2023 (Asian Games 2023) मध्ये भारताच्या ज्योती वेणम आणि ओजस देवतळे यांच्या टीमने कंपाऊंड तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक आपल्या झोळीत पाडले आहे. ज्योती (Jyothi Vennam) आणि ओजस देवतळे (Ojas Deotale) यांनी कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत कोरियन जोडीचा १५९-१५८ असा पराभव केल्याचे बघायला मिळाले आहे. तसेच भारताने जकार्ता या ठिकाणी ७० पदके जिंकण्याचा अनोखा विक्रम देखील मागे टाकला आहे. आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेमध्ये भारताने मिळवलेले आतापर्यंत ७१ वे पदक असल्याचे सांगितले जात आहे. २०१८ मध्ये जकार्ता या ठिकाणी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये देशाने एकूण ७० पदके जिंकली आहेत.
पहिली फेरीमध्ये दोन्ही भारतीय तिरंदाजांनी दोन्ही प्रयत्नांत एकूण प्रत्येकी १० गुण मिळवले आहे. देशाला एकूण पूर्ण ४० गुण मिळाले आहेत. अशावेळी दक्षिण कोरियाच्या तिरंदाजांनी पहिल्या प्रयत्नामध्ये एकूण ९ गुण मिळवले आहेत. पहिल्या फेरीवर स्कोअर ४०-३९ असा भारताच्या टीमच्या बाजूने होता.
🥇🏹 𝗔 𝗚𝗢𝗟𝗗 𝗪𝗜𝗡 𝗜𝗡 𝗔𝗥𝗖𝗛𝗘𝗥𝗬! 🏹🥇#KheloIndiaAthletes Ojas and @VJSurekha have hit the bullseye and clinched India’s FIRST GOLD in archery, defeating Korea by a scoreline of 159 – 158! 🇮🇳🌟
Their impeccable skill and teamwork have earned them the ultimate… pic.twitter.com/eMmhxU6W7b
— SAI Media (@Media_SAI) October 4, 2023
दुसऱ्या फेरीमध्ये कोरियन जोडी ही पहिला प्रयत्न केला आणि चारही बाण अचूक मारून ४० गुण मिळवले होते. त्यात भारतीय तिरंदाजांनीही कोणतीही चूक न करता पूर्ण ४० गुण मिळवले होते. आणि दुसऱ्या फेरीनंतर भारतीय संघ ८०-७९ असा आघाडीवर राहिल्याचे बघायला मिळाले होते.
तिसरी फेरीमध्ये कोरियन तिरंदाजांनी काही दबावाखाली उत्तम प्रकारे कामगिरी केली आणि पूर्ण ४० गुण मिळवले आहेत. देशासाठी ओजसने एका प्रयत्नामध्ये तब्ब्ल ९ गुण मिळवले आहेत, आणि भारताची आघाडी संपली होती. तिसरी फेरी संपल्यावर दोन्ही संघ ११९-११९ अशा समान बरोबरीत बघायला मिळाले.
Gayatri Joshi: किंग खानच्या जवळील अभिनेत्रीचा अपघात; Video Viral
चौथी फेरीमध्ये देशाने प्रथम प्रयत्न केला आणि दोन्ही तिरंदाजांनी १० गुण मिळवले होते. त्यावेळी कोरियाच्या जूला केवळ ९ गुण मिळवता आल्याचे बघायला मिळाले. एकूणच भारताकडे एका गुणाची आघाडी होती. आणि चारही तिरंदाजांनी शेवटच्या प्रयत्नामध्ये १० गुण मिळवले आहे. परंतु जूच्या एका चुकीमुळे अखेरीस भारतीय संघ १५९-१५८ असा आघाडीवर राहिला आणि सुवर्णपदक जिंकल्याचे बघायला मिळाले.
ज्योती वेनमने देशासाठी मोठी कामगिरी करत आठ प्रयत्नांमध्ये सर्वांचेच लक्ष्य वेधले आहे. तिला पूर्ण ८० गुण मिळाले आहेत. त्यावेळी तेजसला एका प्रयत्नामध्ये केवळ ९ गुण मिळवता आल्याचे पाहायला मिळाले. त्याने एकूणच ८ प्रयत्नांमध्ये ७९ गुण मिळवले आहे. मंजू राणी आणि राम बाबू यांनी देखील ३५ किमी रेस वॉक मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये देशाला दिवसातील पहिले पदक मिळवून दिल्याचे बघायला मिळाले आहे. या जोडीने कांस्यपदक जिंकले आहे. सोबतच भारताने गेल्या एशियन गेम्सच्या पदकांच्या संख्येशी समान बरोबरी केल्याचे बघायला मिळाले आहे. २०१८ मध्ये जकार्ता या ठिकाणी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये देशाने एकूण ७० पदके जिंकली आहेत. जकार्ता येथे १६ सुवर्ण, २६ रौप्य आणि २९ कांस्य अशी एकूण ७१ पदके जिंकल्याचे बघायला मिळाले आहे.