खेळाडू नाही बॅटही होतेय रिटायर्ड; ऑस्ट्रेलियन खेळाडू वर्ल्डकप विनर ‘बॅट’ सोडणार
Marnus Labuschagne : 19 नोव्हेंबर 2023 हा दिवस कुठलाच भारतीय सहजासहजी विसरू शकणार नाही. कारण याच दिवशी ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा (Team India) पराभव करत विश्वचषकावर नाव कोरल होता. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) या विजयाचे हिरो होते ट्रॅव्हीस हेड, मारनस लाबुशेन. हा सामन्यात लाबुशेनने अर्धशतक (Marnus Labuschagne) ठोकत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. आता या लाबुशेन बाबत एक मोठी बातमी आली आहे. लाबुशेनने ज्या बॅटने धावांचा पाऊस पाडत टीम इंडियाच्या (One Day World Cup) स्वप्नांवर पाणी फेरले होते त्याच बॅटला रिटायर्ड करण्याचा निर्णय घेणार आहे.
एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनल सामन्यात भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अतिशय खराब झाली होती. सात ओवर्समध्ये तीन विकेट गमावून ऑस्ट्रेलियाने फक्त 47 रन केले होते. याच लाबुशेन मैदानावर उतरला होता. यानंतर हेड (Travis Head) आणि लाबुशेनने शानदार भागीदारी करत भारताचा पराभव केला होता. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 215 चेंडूत 192 धावांची भागीदारी केली होती. हेडने शतक ठोकले होते तर लाबुशेनने 110 चेंडूत 58 धावा केल्या होत्या.
Travis Head : कसा ठरला टीम इंडियासाठी कर्दनकाळ? पाहा व्हिडिओ | LetsUpp Marathi
या सामन्यात लाबूशेनने ज्या बॅटने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली होती त्या बॅटची अवस्था आता अतिशय वाईट झाली आहे. लाबूशेनने इंस्टाग्रामवर या बॅटचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत बॅटची अवस्था अतिशय वाईट झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. या फोटोसह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, वर्ल्डकप फायनल मधील बॅटला रिटायर करण्याची वेळ आता आली आहे असे वाटते.
या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने एकही सामना न गमावता अंतिम फेरीत धडक दिली होती. त्यामुळे भारत हा वर्ल्डकप जिंकणार असेच सगळ्यांना वाटत होते. विशेष म्हणजे याच स्पर्धेतील साखळी सामन्यात भारताने कांगारूंचा पराभव केला होता. त्यामुळे वर्ल्डकप भारताचाच आहे असेच सगळ्यांना वाटत होते. पण फायनल सामन्यात सगळं उलटच घडलं. ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ करत आपला सहावा वर्ल्डकप जिंकला. पण भारताच वर्ल्डकप जिंकण्याचा स्वप्न मात्र भंगलं.
View this post on Instagram
या सामन्यात लाबुशेनने दमदार कामगिरी केली होती. त्याच्या खेळीने भारताचे वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं होतं. या स्पर्धेत सर्व सामने भारताने जिंकले होते. फक्त एकच पराभव झालो तोही फायनलमध्ये. ट्रॅव्हिस हेड आणि लाबुशेनने अडचणीच्या काळात संघाचा डाव सावरला आणि विजयी भागीदारी केली. या दोघांपैकी एकाचीही विकेट लवकर घेऊन भागीदारी तोडण्याचे काम भारतीय गोलंदाजांना करता आले नव्हते.