MI vs CSK: गोलंदाजांच्या पाठोपाठ सीएसकेच्या फलंदाजांची कमाल, चेन्नईचा मुंबई वर मोठा विजय
आयपीएल 2023 च्या 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर सहा गडी राखून विजय मिळवला. 6 मे (शनिवार) रोजी एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने सीएसकेला विजयासाठी 140 धावांचे लक्ष्य दिले होते, जे धोनीच्या संघाने 18 व्या षटकात पूर्ण केले. या विजयासह चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
पवार म्हणाले, भाकर फिरवली पाहिजे मात्र त्यांनी निर्णय फिरवला…विखेंचा खोचक टोला
कॉनवे-गायकवाडची शानदार फलंदाजी
140 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी चेन्नई संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून अवघ्या 4.1 षटकात 46 धावांची भागीदारी केली. पियुष चावलाने ऋतुराजला यष्टिरक्षक इशान किशनकरवी झेलबाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. ऋतुराजने 16 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांसह 30 धावा केल्या. यानंतर कॉनवे आणि रहाणे यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी झाली. 21 धावांची खेळी करणारा अजिंक्य रहाणेही पियुष चावलाचा बळी ठरला.
इम्पॅक्ट खेळाडू अंबाती रायुडूकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती, पण तो 12 धावा करून ट्रिस्टन स्टब्सचा बळी ठरला. चेन्नईला चौथा धक्का डेव्हॉन कॉनवेच्या रूपाने बसला, तो 44 धावांवर आकाश मधवालचा बळी ठरला. कॉनवेने आपल्या खेळीत चार चौकार मारले. येथून शिवम दुबे आणि एमएस धोनी (2) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला. दुबेने तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 26 धावा केल्या.
मुख्यमंत्र्यांच्या कृतीने मराठी मन दुखावले; रोहित पवारांचा शिंदेंवर हल्लाबोल
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सने 14 धावांत तीन गडी गमावले. सर्वप्रथम मुंबईने तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर कॅमेरून ग्रीनची विकेट गमावली. त्याचवेळी इशान किशन आणि रोहित शर्मा यांना दीपक चहरने एकाच षटकात बाद केले तीन विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा यांच्यात 55 धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे मुंबईला संकटातून बाहेर काढले. सूर्याने 3 चौकारांच्या मदतीने 26 धावा केल्या तो रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला.
नेहल वढेराने शानदार खेळी केली
69 धावांत चार विकेट पडल्यानंतर नेहल वढेरा आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी पाचव्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. डावखुरा फलंदाज वढेराने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावताना 64 धावा केल्या, ज्यात आठ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. वढेरा बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव वेग पकडू शकला नाही आणि 20 षटकांत आठ गडी गमावून केवळ 139 धावाच करू शकला. सीएसकेकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याचवेळी तुषार देशपांडे आणि दीपक चहर यांनी प्रत्येकी दोन खेळाडूंना बाद केले.