IND vs PAK : पाकिस्तानचा डाव गडगडला! भारताला दिले 242 धावांचे आव्हान

IND vs PAK : पाकिस्तानचा डाव गडगडला! भारताला दिले 242 धावांचे आव्हान

Champions Trophy 2025 India vs Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 241 धावांचे आव्हान दिले. कर्णधार रिजवान आणि रउफ यांनी डाव सावरला होता. यानंतर दोघे आऊट झाले आणि पाकिस्तानचा (Pakistan Cricket) डाव गडगडला. शेवटच्या ओव्हरमध्ये धावांचा वेग वाढला होता. तळाच्या फलंदाजांनी धावा केल्याने पाकिस्तानला 241 धावांचे आव्हान उभे करता आले. भारतीय गोलंदाजीत अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांनी विकेट घेत धावसंख्येला ब्रेक लावला. त्यामुळे पाकिस्तानी फलंदाजांना पूर्ण 50 ओव्हर्सही खेळता आल्या नाहीत. 49.4 ओव्हर्समध्ये 241 धावा करता आल्या. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला (Team India) 242 धावा कराव्या लागणार आहेत.

IND vs PAK : पाकिस्तान बॅकफूटवर! एकामागोमाग तीन धक्के; भारताने लावली विकेट्सची रांग

पाकिस्तानसाठी हा सामना करो या मरोचा आहे. कारण पहिल्या सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे भारता विरुद्धचा सामना जिंकणे पाकिस्तानसाठी अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे या सामन्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंनी जोरदार तयारी केली होती. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इमाम उल हक आणि बाबर आझम सलामीला आले. या दोघांकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. परंतु असे घडले नाही. संघाच्या 42 धावा झालेल्या असताना बाबर आझमच्या रुपात पहिला धक्का बसला. यानंतर लगेचच म्हणजे 47 धावा झालेल्या असताना इमाम उल हक बाद झाला. 50 धावांच्या आतच सलामीचे फलंदाज तंबूत परतले होते.

त्यानंतर कर्णधार रिजवान आणि सउद शकील या दोघांनी डाव सावरला. रिजवानने 77 चेंडूत 46 तर सउदने 76 चेंडूत 62 धावा केल्या. या दोघांच्या भागीदारीने डाव सावरला गेला. भारताला दोघांची भागीदारी तोडणे आवश्यक होते. यावेळी भारतीय खेळाडूंनी कॅच सोडून फलंदाजांनी जीवदानही दिले. परंतु, याचा फायदा या फलंदाजांना घेता आला नाही. फिरकी गोलंदाज अक्षर पटेलच्या एका चेंडूवर रिजवान बाद झाला आणि ही भागीदारी तोडण्यात टीम इंडियाला यश मिळाले.

Video : सामना ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचा अन् राष्ट्रगीत भारताचं, लाहोरच्या मैदानात पाकिस्तानची पुरती फजिती

151 धावा झालेल्या असताना रिजवान बाद झाला. यानंतर 35 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सउद शकीलही तंबूत परतला. अक्षर पटेलने झेल घेत सउदला तंबूत धाडले. यानंतर मात्र पाकिस्तानचे बाकीचे फलंदाज खेळपट्टीवर फार काळ टिकू शकले नाहीत. शेवटच्या पाच ते सहा ओव्हर्समध्ये धावांचा वेग वाढला होता. परंतु, विकेटही पडत होत्या. त्यामुळे पाकिस्तानला एकूण 241 धावाच करता आल्या. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 242 धावा कराव्या लागणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube