पाकिस्तानवर नामुष्की! श्रीलंकेचा संघ सामना सोडून मायदेशी रवाना; कारणही धक्कादायक
Sri Lanka Leave Pakistan Tour : पाकिस्तानातील सध्याची परिस्थिती अत्यंत खराब झाली (Sri Lanka Cricket) आहे. दहशतवादी हल्ले तर नित्याचेच झाले आहेत. ठिकठिकाणी हिंसाचार उफाळून येत आहे. तसेच विरोधी पक्षाच्या प्रदर्शनानेही येथील राजकारण ढवळून निघालं आहे. अशा अत्यंत असुरक्षित वातावरणाचा फटका पाकिस्तान सरकार आणि क्रिकेट बोर्डाला (Pakistan Cricket Board) बसला आहे. खरं तर ही नामुष्कीच म्हणावी लागेल की श्रीलंका अ संघाने क्रिकेट सामन्यांची मालिका अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका अ संघ आणि पाकिस्तान शाहीन संघ यांच्यात मालिका सुरू होती.
अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका क्रिकेटच्या अधिकाऱ्यांत झालेल्या चर्चेनंतर या मालिकेतील दोन एकदिवसीय सामने रद्द करण्यात आले आहेत. हे दोन्ही सामने रावळपिंडीमध्ये खेळले जाणार होते. यानंतर आता ही मालिका पूर्ण करण्यासाठी भविष्यात कार्यवाही करण्यात येईल असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानात हिंसाचार! इम्रान खान समर्थकांच्या आंदोलनाला गालबोट; 6 सुरक्षा जवानांचा मृत्यू
काही वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या संघावर पाकिस्तानात हल्ला झाला होता. त्यामुळे मैदानातून संघाची मायदेशी जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानची जगभरात मोठी नाचक्की झाली होती. आताही तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. दहशतवादाला खतपाणी घालून त्याला पोसणाऱ्या पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी यातून कोणताच धडा घेतलेला नाही असेच म्हणावे लागेल.
दरम्यान, क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ पाकिस्तानात दाखल झाला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी हा सामना होणार होता. परंतु, येथील परिस्थिती पाहता श्रीलंका संघाने लगेचच पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. सध्या पाकिस्तानात दहशतवादी हल्ले आणि विरोधी पक्षाच्या प्रदर्शनामुळे परिस्थिती चिघळली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
SL Vs NZ 2024 : 5 दिवस नाही, श्रीलंका.. न्यूझीलंडमधील पहिला कसोटी सामना चालणार 6 दिवस, ‘हे’ आहे कारण