IND vs ENG : भारताच्या लेकींची कमाल, पहिल्या सामन्यात इंग्लंडचा धुव्वा; दीप्ती शर्मा चमकली

IND vs ENG : इंग्लंडमधील साउथम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG)च्यातील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी केली. भारतीय संघाच्या (Team India) लॉर्ड्स मैदानावरील पराभवाचा वचपा काढला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा चार गडी राखून पराभव केला. दीप्ती शर्मा अर्धशतक केले स्नेह राणा हीच्या प्रभावी गोलंदाजांनी भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
या विजयाबरोबरच भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने (India vs England) प्रथम फलंदाजी घेतली होती. त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला.
भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौडने सुरुवातीलाच धक्का दिला. टॅमी ब्यूमोंट (5) आणि एमी जोन्स (1) या दोन फलंदाजांना लवकरच बाद केले. त्यामुळे इंग्लंडचा स्कोअर 20 धावांवर 2 बाद असा झाला. एम्मा लॅम्ब (39 रन) आणि कर्णधार नॅट साइवर ब्रंट (41 रन) या दोघींनी 71 धावांची भागीदारी केली. त्यामुळे इंग्लंडचा डाव काही प्रमाणात सावरला. नंतर स्नेह राणाने या दोन्ही फलंदाजांना बाद केले.
IND vs ENG पहिली कसोटी, IPL मध्ये धुमाकूळ घालणारा खेळाडू करणार भारतासाठी डेब्यू; पहा प्लेइंग इलेव्हन
सोफिया डंकले हीने 83 धावा करत संघाचा डाव सावरला. तिने डेविडसन रिचर्ड्स बरोबर शतकी भागीदारी केली. सोफी एक्लेस्टोनने शेवटच्या टप्प्यात 23 धावांची महत्वाची खेळी केली. इंग्लंडने संपूर्ण 50 ओव्हर्समध्ये 258 धावा केल्या. भारताकडून राणाने 2 आणि गौडने 2 विकेट्स घेतल्या. अमनज्योत कौर आणि श्री चरणी या दोघांनी एक-एक विकेट घेतली.
इंग्लंडच्या या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. सलामी जोडी प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या दोघींनी 48 धावांची भागीदारी केली. यानंतर रावलने हरलीन देओल सोबतही 46 धावांची भागीदारी केली. यानंतर जेमिमा रोड्रिग्सने दिप्ती शर्माबरोबर 87 धावांची मोठी भागीदारी केली. ऋचा घोष लवकरच बाद झाली. परंतु, दीप्ती शर्मा आणि अमनज्योत कौर या दोघींनी भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
BCCI बांग्लादेशला देणार दणका! टीम इंडियाचा नियोजित दौरा टळण्याची चिन्हे; काय घडलं?