हाउज द जोश! 64 वर्षे वयाच्या खेळाडूची क्रिकेटमध्ये एन्ट्री अन् इतिहासच घडला; जोआना चाइल्ड कोण?

Joanna Child : क्रिकेटमध्ये तुम्हाला युवा खेळाडूच दिसतील. या खेळात फिटनेसला (Cricket News) खूप महत्व आहे. वयाच्या तिशी पार केली की खेळाडूच्या मनात निवृत्तीचे विचार घोळू लागतात. पस्तिशीत येईपर्यंत तर खेळाडू क्रिकेटमधून निवृत्त झालेले असतात. म्हणजे काय तर क्रिकेटमध्ये वयाचं बंधन आहे असाच आतापर्यंतचा नियम. पण थांबा, हा नियम एका वयोवृद्ध खेळाडूनं तोडलाय. हो हे खरं आहे. ज्या वयात नातवंड पतवंडांना खेळवायचं त्याच वयात एक महिला खेळाडूने क्रिकेटमध्ये पदार्पण करुन इतिहास घडवला आहे. जोआना चाइल्ड असे (Joanna Child) या खेळाडूचे नाव असून त्यांचं वय 64 आहे.
जोआना चाइल्ड यांनी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून रेकॉर्ड बुकमध्ये नाव कोरलं आहे. जोआना यांनी 7 एप्रिल रोजी अल्बर्गारियात नॉर्वे विरुद्ध टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पोर्तुगालकडून () खेळताना हा कारनामा केला.
View this post on Instagram
चाइल्ड यांनी अँड्र्यूज ब्राउनली (62 वर्षे 145 दिवस) आणि मॅली मूर (62 वर्षे 25 दिवस) या दोन्ही खेळाडूंना मागे टाकून यादीत दुसरा क्रमांक मिळवला. आता चाइल्ड यांच्या पुढे जिब्राल्टरच्या सॅली बार्टन या एकाच खेळाडूचं नाव आहे. बार्टन यांनी 66 वर्षे 334 दिवसांच्या वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) पदार्पण केलं होतं.
रोहित शर्माच्या जागी कोण? गौतम गंभीरला सापडला ‘हा’ धडाकेबाज खेळाडू, निवड होणार?
डेब्यू मॅचमध्ये कामगिरी निराशाजनक
जोआना चाइल्ड यांना त्यांच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात विशेष काही करता आलं नाही. फलंदाजी करताना त्यांना फक्त दोन धावा करता आल्या. तर गोलंदाजीत चार चेंडूत 11 धावा दिल्या. या सामन्यात जोआना यांना चांगली कामगिरी करता आली नाही हे जरी खरं असलं तरी 64 वर्षांच्या वयात क्रिकेट खेळणं हीच एक मोठी गोष्ट आहे. त्यांच्या या हिंमतीचं क्रिकेट चाहते कौतुक करत आहेत.
🚨 64-YEAR OLD JOANNA CHILD MADE HER T20I DEBUT FOR PORTUGAL. 🚨 pic.twitter.com/lF3AZIvzdq
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 11, 2025
पोर्तुगालने मालिका जिंकली
जोआना यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या मालिकेत पोर्तुगाल संघाने 2-1 ने विजय मिळवला. या मालिकेत नॉर्वेची टीम अपयशी राहिली. पोर्तुगाल संघाने चांगली कामगिरी केली. त्यामुळे एकूण तीन सामन्यांच्या मालिकेत दोन सामने जिंकून पोर्तुगालने विजय मिळवला. परंतु. या मालिकेत सर्वाधिक चर्चा जोआना चाइल्ड यांचीच झाली. ज्या वयात शरीर थकून जाते. कोणतेही काम करणे कठीण होते. अशा वेळी त्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आजच्या युवा खेळाडूंसाठी ही प्रेरणादाय अशीच गोष्ट आहे.
128 वर्षांनंतर ‘गोल्ड मेडल’ साठी भिडणार क्रिकेट संघ, 2028 ऑलिंपिकमध्ये अमेरिकेसह ‘या’ संघाला संधी?