बुमराहच्या ओव्हरमध्ये मोठा राडा, शुभमन गिल भडकला, वादाला फुटलं तोंड; Video पाहाच..

बुमराहच्या ओव्हरमध्ये मोठा राडा, शुभमन गिल भडकला, वादाला फुटलं तोंड; Video पाहाच..

IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना (IND vs ENG 3rd Test) लॉर्ड्स मैदानावर सुरू आहे. जसप्रित बुमराहने (Jasprit Bumrah) टाकलेल्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या ओव्हरमध्ये मोठा वाद झाला. जॅक क्राउलीला हीच ओव्हर शेवटची व्हावी असे वाटत होते. त्यामुळे तो विनाकारण टाइमपास करत होता. त्यामुळे शुभमन गिल चांगलाच (Shubman Gill) भडकला. तो थेट क्राउलीकडे गेला आणि बोट दाखवून (India vs England) त्याला काहीतरी म्हणाला.

शुभमन गिल का भडकला

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्याच्या काही दिवस आधीच भारतीय संघाची (Team India) फलंदाजी संपली होती. यानंतर इंग्लंडचे फलंदाज (England Cricket) मैदानात आले. दिवसाचा खेळ संपण्यासाठी काही वेळच शिल्लक राहिला होता. इंग्लंडला वाटत होतं की बुमराहकडून टाकली जात असलेली ओव्हरच या दिवसाची अखेरची ओव्हर व्हावी.

IND vs ENG पहिली कसोटी, IPL मध्ये धुमाकूळ घालणारा खेळाडू करणार भारतासाठी डेब्यू; पहा प्लेइंग इलेव्हन

या कारणामुळे क्राऊली मैदानावर जाणूनबुजून वेळेचा अपव्यय करत होता. पाचव्या चेंडूवर त्याने डिफेन्स केल्यानंतर हाताला लागल्याचे त्याने भासवले. त्याने ड्रेसिंग रुमकडे इशारा केला. त्याचा हा प्रकार पाहून शुभमन गिल चांगलाच संतापला. आधी सर्व भारतीय खेळाडूंनी (Indian Cricket Team) टाळ्या वाजवून क्राऊली करत असलेल्या कृत्याची चेष्टा केली. यानंतर गिल स्वतः क्राऊलीकडे गेला आणि त्याला काहीतर बोलला.

जसप्रित बुमराहच्या ओव्हरनंतर आणखी एक ओव्हर टाकली जावी असे भारतीय संघाला वाटत होते. परंतु, विकेट पडेल या भीतीने इंग्लंडला आणखी एक ओव्हर नको होती. याआधी शेवटच्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर क्राऊली बाजूला झाला होता. बुमराह आणि सिराज दोघेही क्राऊलीशी रागाच्या भरात वाद करताना दिसून आले. त्यामुळे या सामन्यातील वादांची चर्चा आता होत आहे.

IND vs ENG 3rd ODI : भारताचा धमाकेदार विजय, 142 धावांनी पराभव करत इंग्लंडचा केला व्हाईटवॉश

follow us
  • fb
  • instagram
  • youtube