टीम इंडियाच ठरणार जगज्जेता, वर्ल्डकप जिंकणारच! डॉ. इराणींचं भाकित..

टीम इंडियाच ठरणार जगज्जेता, वर्ल्डकप जिंकणारच! डॉ. इराणींचं भाकित..

प्रशांत गोडसे, मुंबई

Team India : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात झाली (Champions Trophy 2025) आहे. स्पर्धेमध्ये भारताने विजयी सुरुवात करत पाकिस्तानला स्पर्धे बाहेरचा रस्ता दाखवला आहे. संपूर्ण जगभरात क्रिकेट रसिकांमध्ये सध्या क्रिकेटचं फीवर पाहायला मिळत आहे. भारतात तर क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे क्रिकेटशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यात क्रिकेट रसिकांना रस असतो. विश्वचषक कोण जिंकेल यावरती तर्कवितर्क लावले जात असतांना भारतीय क्रिकेट संघाचे माजी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अली इराणी यांनी भारतीय संघ विश्वचषक जिंकून नवीन इतिहास घडवेल असा विश्वास लेट्सअप मराठीसोबत बोलताना व्यक्त केला आहे.

भारतीय संघ वर्ल्डकप स्पर्धा जिंकणार का असा प्रश्न विचारला असता इराणी म्हणाले, सध्या पाकिस्तानात  आयसीसीची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी पाहता भारतीय संघ आगामी विश्वचषक स्पर्धा सुद्धा सहज जिंकेल असा विश्वास माजी फिजिओथेरपीस्ट डॉ. अली इराणी यांनी व्यक्त केला.

आजच्या क्रिकेटपटूंसाठी फिटनेस अनिवार्य घटक बनला असला, तरी भारतीय क्रिकेटमध्ये एक काळ असा होता जेव्हा संघाकडे फिजिओथेरपिस्टही नव्हता. १९८७ मध्ये डॉ. अली इराणी भारतीय संघाचे पहिले अधिकृत फिजिओथेरपिस्ट बनले आणि त्यांनी संघातील खेळाडूंच्या दुखापतींवर जागीच उपचार करून त्यांना लवकरात लवकर पुनरागमन करण्यास मदत केली.

Champions Trophy 2025: भारताचा पाकिस्तानवर विराट विजय; कोहलीची बॅट तळपली, जबरदस्त शतक ठोकले!

डॉ. इराणी यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात लेट्सअप मराठी सोबत सवांद साधला. यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेट संघाविषयीच्या (Team India) आपल्या आठवणींना उजाळा दिला. त्याकाळी खेळाडूंना जिमबाबत फारशी माहिती नव्हती. “त्यावेळी कोणालाही जिमचा वापर कसा करावा हे माहीत नव्हते. फलंदाज नॉकिंग करायचे आणि गोलंदाज भिंतीवर गोलंदाजी करायचे, हेच त्यांचे वॉर्मअप होते,” असे ते म्हणाले.

आजच्या तुलनेत तेव्हाचे फिटनेस नियम वेगळे होते. “१९८७ मध्ये कपिल देव हॉकी संघासोबत सराव करून मग क्रिकेट संघात सामील होत असत. बऱ्याचदा ते स्वतःला फिट ठेवण्यासाठी मॅरेथॉन धावत असत,” असे इराणी यांनी सांगितले.

फिटनेस चाचण्यांसंदर्भात ते म्हणाले, “आमच्या काळात एका मिनिटात खेळाडू किती धावा काढू शकतो यावर फिटनेस मोजला जात असे. काही खेळाडू १४ धावा काढत तर काहीजण हेल्मेटसह साडे १६ धावा देखील काढू शकत होते.”

आज भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. विराट कोहलीसारख्या (Virat Kohli) खेळाडूंनी याला आणखी पुढे नेले असून आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षकांच्या मदतीने खेळाडूंचा सराव अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने होतो.

Champions Trophy 2025: जोशची इंग्लंडवर बॉसगिरी ! ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक धावा करत सामना जिंकला

डॉ. अली इराणी नानावटी मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे फिजिओथेरपी आणि स्पोर्ट्स मेडिसिन विभागाचे प्रमुख NMIMS विद्यापीठाचे प्राचार्य देखील आहेत. तसेच त्यांनी 1987 ते 1997 कालावधीत भारतीय क्रिकेट संघासाठी फिजिओथेरपिस्ट काम पाहिले आहे. या काळात त्यांनी दुखापतग्रस्त खेळाडूंवर उपचार करून त्यांना लवकरात लवकर बरे करण्यावर भर दिला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube