IND vs AFG : मोठे रेकॉर्ड्स अन् वादही; ‘या’ कारणांमुळे तिसरा सामना क्रिकेटमध्ये ‘हिट’

IND vs AFG : मोठे रेकॉर्ड्स अन् वादही; ‘या’ कारणांमुळे तिसरा सामना क्रिकेटमध्ये ‘हिट’

IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि (IND vs AFG) अखेरचा टी 20 सामना जिंकून टीम इंडियाने (Team India) अफगाणिस्तानला व्हाईटवॉश दिला. टी 20 क्रिकेटच्या इतिहासात तिसरा सामना कायम लक्षात राहिल असाच ठरला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड झाले तसेच काही वादही पाहण्यास मिळाले. पहिल्यांदाच दोन सुपर ओव्हरही टाकण्यात आल्या. या सामन्यात असे काय खास घडले याची माहिती जाणून घेऊ या..

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 212 धावा केल्या. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत अफगाणिस्तानने (India vs Afghanistan) 212 धावा करत सामना अनिर्णित ठेवला. त्यानंतर पहिली सुपर ओव्हर टाकण्यात आली. ही सुपर ओव्हरही टाय झाली.

या सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने 16 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्ताननेही 16 धावा केल्या. त्यामुळे पहिली सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागला नाही. त्यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहित आणि रिंकूने (Rinku Singh) फलंदाजी करत 11 धावा केल्या. त्यानंतर अफगाणिस्तानने फलंदाजी करताना पहिल्या तीन चेंडून 2 विकेट गमावल्या आणि भारताने हा सामना जिंकला.

Rohit Sharma : शू्न्यावर आऊट झाला तरीही इतिहास रचला; ‘या’ खास रेकॉर्डचा रोहित मानकरी

या सामन्यात वादही झाला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्माने (Rohit Sharma) स्वतःहून मैदान सोडले होते. तरी देखील दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये तो फलंदाजीसाठी आला होता. यावरून रोहित रिटायर हर्ट की रिटायर आऊट असा प्रश्न उपस्थित झाला. यावरून काही काळ गोंधळ झाला होता.

हा सामना क्रिकेटच्या इतिहासात असा पहिलाच सामना ठरला ज्यामध्ये दोन सुपर ओव्हर टाकण्यात आल्या. याआधी आयपीएलमध्ये दोन सुपर ओव्हरचा सामना मुंबई आणि पंजाब यांच्यात झाला होता.

या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 414 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये बरोबरीत सुटलेला हा सर्वाधिक धावा असलेला दुसरा सामना आहे. याआधी 2010 मध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 428 रन झाले होते. हा सामनाही अनिर्णित राहिला होता.

IND vs AFG : रोहितचे तुफानी शतक, रिंकूची धुवांधार फिफ्टी; अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर

या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 121 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 शतके करणारा तो पहिला फलंदाज ठरला. रोहितने सूर्यकुमार यादव आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनाही मागे टाकले.

रोहित शर्मा टी 20 क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात सिनियर खेळाडू ठरला आहे. रोहितने या सामन्यात शतक केले त्यावेळी त्याचे वय 36 वर्षे 262 दिवस होते. त्याने वेस्टइंडिजचा खेळाडू ख्रिस गेलचा विक्रम मोडला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube