IND vs AUS, 3rd ODI : ऑस्ट्रेलिया रोखणार विजयाचा रथ? तिसरी मालिका खिशात घालण्याची भारताला संधी
IND vs AUS : सध्या भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. पहिले दोन सामने झाले असून त्यात दोन्ही संघ १-१ ने जिंकून मालिकेत बरोबरीवर आहेत. आता तिसरा आणि निर्णायक सामना 22 मार्चला होणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दुपारी 1.30 पासून खेळवला जाईल.
स्पर्धा अतिशय रंजक ठरणार
चेन्नईमध्ये पावसाचा अडथळा ठरला नाही, तर या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील हा शेवटचा आणि निर्णायक सामना खूपच मनोरंजक ठरू शकतो. कारण हे दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचे दिसत आहे. दोन्ही संघांमध्ये विशेषज्ञ फलंदाज आणि गोलंदाजांसह अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांच्यामध्ये अनेक सामना जिंकणारे खेळाडू आहेत, जे कोणत्याही परिस्थितीत सामन्याची स्थिती आणि दिशा बदलू शकतात.
याशिवाय ऑस्ट्रेलियाने ज्या प्रकारे टीम इंडियाचा शेवटच्या वनडेत पराभव केला त्यामुळे हा अंतिम सामनाही रंजक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घरच्या मैदानावरही ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे भारतीय संघासाठी सोपे जाणार नाही. त्यानंतर हा सामना ज्या मैदानावर होणार आहे, त्या मैदानावर पाहुण्या संघाचा विक्रम यजमानापेक्षा सरस ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने चेपॉकमध्ये 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघाने येथे 13 पैकी केवळ 7 सामने जिंकले आहेत.
IND vs AUS : चेन्नईत उद्या आरपारची लढाई, संभाव्य प्लेइंग 11 पाहा
भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.