IND vs AUS : मालिका जिंकण्यासाठी भारताला 270 धावांचे लक्ष्य

IND vs AUS : मालिका जिंकण्यासाठी भारताला 270 धावांचे लक्ष्य

चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील निर्णायक सामना सध्या चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात 269 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली, तर भारताकडून गोलंदाजीत उपकर्णधार हार्दिक पांड्या (hardik pandya) आणि कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) 3-3 बळी घेतले. आता ही मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला 270 धावांचे लक्ष्य आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 68 धावांची शानदार भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर हार्दिक पांड्याने हेडच्या रुपात टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले, त्याला 33 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर बॅटिंगला आलेला कर्णधार स्टीव्ह स्मिथला खाते न उघडता हार्दिक पांड्याने पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

दिल्लीत आज पुन्हा भूकंपाचे धक्के; 24 तासात दुसऱ्यांदा हादरे

47 धावांची शानदार खेळी केल्यानंतर हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या मिचेल मार्शच्या रूपाने 85 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या संघाला तिसरा मोठा धक्का बसला. इथून डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबुशेन यांच्यात चौथ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. कुलदीप यादवने वॉर्नर आणि लबुशेन यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या 138 धावांपर्यंत 5 विकेट पडल्या होत्या.

निम्मा संघ अवघ्या 138 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर, मार्कस स्टॉइनिस आणि अॅलेक्स कॅरी यांनी डाव सावरला. 6व्या विकेटसाठी 54 चेंडूत 58 धावांची भागीदारी करत धावसंख्या 200 च्या जवळ नेली. स्टॉइनिस 25 आणि कॅरी 38 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर सीन अॅबॉट आणि अॅश्टन अगर यांनी 8व्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी करत धावसंख्या 250 पर्यंत नेली.

शॉन अॅबॉटने 26, तर अॅश्टन अगरने 17 धावांची खेळी केली, तर मिचेल स्टार्क आणि अॅडम झाम्पा यांनी शेवटच्या विकेटसाठी 22 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 269 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताकडून हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी गोलंदाजीत ३-३ तर अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजने 2-2 बळी घेतले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube