क्रिकेट प्रेमीसाठी खुशखबर; पाऊस आला तरीही भारत-पाकिस्तान महामुकाबला होणार, ACC चा मोठा निर्णय

क्रिकेट प्रेमीसाठी खुशखबर; पाऊस आला तरीही भारत-पाकिस्तान महामुकाबला होणार, ACC चा मोठा निर्णय

Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात होणार्‍या आशिया कपच्या सुपर-4 सामन्यासाठी (Asia Cup Super-4) आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) नियमात बदल केला आहे. रविवारी (10 सप्टेंबर) सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यास सामना राखीव दिवशी पूर्ण होईल. यापूर्वी आशिया चषक स्पर्धेत राखीव दिवस नव्हता. एसीसीने आज दोन्ही संघांमधील सामन्यासाठी हा नियम केला आहे.

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना रविवारी होणार आहे. 2 सप्टेंबर रोजी दोन्ही संघांमधील गट फेरीत सामना खेळवण्यात आला होता, परंतु पावसामुळे तो रद्द करण्यात आला होता. विशेष म्हणजे राखीव दिवस ठेवण्यात आलेला भारत-पाकिस्तान सामना हा एकमेव सुपर-4 सामना आहे. इतर कोणत्याही सुपर-4 सामन्यासाठी ही सुविधा उपलब्ध होणार नाही. याशिवाय 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे.

कोलंबोमध्ये पावसाची शक्यता
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. कोलंबोमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यातून सामन्यांचे यजमानपद काढून घेण्याचीही चर्चा होती. हे सामने हंबनटोटा किंवा दांबुला येथे हलवले जातील, असे मानले जात होते, परंतु तसे झाले नाही. आता आशिया चषकाचे उर्वरित सर्व सामने येथे खेळवले जातील.

मोठी बातमी: निवडणूक आयोगात शरद पवार गटाचे उत्तर दाखल, अजित पवार गटाचे सगळे दावे फेटाळले

हवामानाचा अंदाज काय आहे?
Accuweather वेबसाइटनुसार, सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता 90 टक्के आहे. रात्री गडगडाटी वादळाचीही शक्यता आहे. दिवसाच्या तुलनेत रात्री पावसाचा जोर वाढू शकतो. त्याची शक्यता 96 टक्क्यांपर्यंत आहे. रात्रभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता 98 टक्के आहे. Weather.com ने देखील पावसाची 90 टक्के शक्यता वर्तवली आहे.

Maratha Reservation : बीडमध्ये आरक्षणाची धग कायम! महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेतलं…

सामना रद्द झाला तर?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोलंबोतील सामन्यात पाऊस आला तर हा सामना राखीव दिवशी होईल. राखीव दिवशीही निकाल लागला नाही, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube