IND vs BAN: भारताचा बांगलादेशवर 108 धावांनी शानदार विजय, मालिकेत केली 1-1 ची बरोबरी

  • Written By: Published:
IND vs BAN: भारताचा बांगलादेशवर 108 धावांनी शानदार विजय, मालिकेत केली 1-1 ची बरोबरी

IND vs BAN: भारत आणि बांगलादेशच्या महिला संघादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने 108 धावांनी जिंकला. ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना भारताने 228 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 120 धावांवर गारद झाला आणि भारताने 108 धावांनी सामना जिंकला. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. (India beat by 108 runs in Bangladesh 1-1 level the series )

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 228 धावा केल्या. जेमिमाने सर्वाधिक 86 धावांचे योगदान दिले. कर्णधार हरमनप्रीतने 52 धावा केल्या. बांगलादेशकडून सुल्ताना आणि नाहिदाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ केवळ 120 धावा करू शकला. फरगाना हकने 47 आणि रितू मोनीने 27 धावांचे योगदान दिले. या गोघींशिवाय फक्त मुर्शिदा खातून (12 धावा) दुहेरी आकडा गाठू शकली.

भारत आणि वेस्ट इंडिजची दुसरी कसोटी होणार ऐतिहासिक, जाणून घ्या काय आहे कारण

229 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने एका टप्प्यावर 3 बाद 106 धावा केल्या होत्या आणि सामना कायम होता. मात्र, यानंतर 14 धावांत संघाच्या सात विकेट पडल्या आणि भारताला मोठा विजय मिळाला. भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. देविका वैद्यने तीन गडी बाद केले.

या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली असून मागील सामन्यातील मानहानीकारक पराभवाचा बदला घेतला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube