भारताचा दुसऱ्या कसोटीत ऐतिहासिक विजय; गिलच्या नेतृत्त्वात इंग्लंडला चारली धूळ

भारताचा दुसऱ्या कसोटीत ऐतिहासिक विजय; गिलच्या नेतृत्त्वात इंग्लंडला चारली धूळ

India England Test 2025 : भारताने दुसऱ्या कसोटीत ऐतिहासिक (India) विजय मिळवलाय. शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतानं इंग्लंडला तब्बल 336 धावांनी पराभूत केलंय. भारतानं फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्व गोष्टींमध्ये अफलातून कामगिरी करत एजबेस्टनवर इतिहास रचला आहे.

भारतानं इंग्लंडला 336 धावांनी पराभूत केलं, इंग्लंडचा दुसरा डाव 271 धावांवर आटोपला. भारतानं पहिल्या डावात 587 धावा केल्या, दुसऱ्या डावात 6 बाद 427 धावांवर डाव घोषित केला. तर, इंग्लंडला पहिल्या डावात 407 धावांवर सिराज आणि आकाश दीपच्या गोलंदाजीमुळं रोखण्यात यश आलं.

बर्मिंगहॅममध्ये भारताचा ऐतिहासिक विजय;धावांनी इंग्लंडला नमवलं, मालिकेत बरोबरी

भारतीय क्रिकेट संघ हेडिंग्लेच्या लीड्सच्या मैदानावरील पराभवाची सल मनात घेऊन बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर उतरला होता. दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स यानं टॉस जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजीला बोलावण्याचा निर्णय घेतला. भारताच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 587 धावा केल्या.

यशस्वी जयस्वालनं 87 धावांची खेळी करत चांगली सुरुवात केली. यानंतर करुण नायर, केएल राहुल मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. याचवेळी कॅप्टन शुभमन गिल यानं रवींद्र जडेजा सोबत 203 धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजानं 89 धावांची खेळी केली. शुभमन गिलनं 269 धावांची खेळी केली. भारत या जोरावर 587 धावांपर्यंत पोहोचला.

भारतानं मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला पहिल्या डावात 407 धावांवर रोखलं. सिराजनं 6 विकेट घेतल्या तर आकाश दीपनं 4 विकेट घेतल्या. हॅरी ब्रुकनं 158 धावा केल्या तर जेमी स्मिथ 184 धावा करुन नाबाद राहिला.  इंग्लंडचा संघ 407 धावांवर बाद झाला आणि भारताला 180 धावांची आघाडी मिळाली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या