Ind Vs Pak : वर्ल्डकपपूर्वी भारत-पाक संघ तीन वेळा येणार आमने-सामने; वाचा सविस्तर

Ind Vs Pak : वर्ल्डकपपूर्वी भारत-पाक संघ तीन वेळा येणार आमने-सामने; वाचा सविस्तर

India vs Pakistan 2023 Asia Cup Matches:  क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात जेव्हा कधी सामना होतो, तेव्हा उत्कंठा शिगेला पोहोचते. दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते भारत-पाक सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी खेळल्या गेलेल्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ तीन वेळा आमनेसामने येऊ शकतात.

यावेळी आशिया चषक हायब्रिड मॉडेल म्हणून आयोजित केला जाणार आहे. वास्तविक, 2023 च्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला मिळणार होते, परंतु भारत तेथे न गेल्याने हे मॉडेल आणले आहे. या मॉडेलनुसार आशिया चषक स्पर्धेतील पहिले ४ सामने पाकिस्तानमध्ये आणि उर्वरित ९ सामने श्रीलंकेत खेळवले जातील.

Virat Kohli 500 Match : कोहली मोडणार सचिनचा विक्रम? जाणून घ्या ‘विराट’ मिशन

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ एकाच गटात आहेत आणि या दोन्ही संघांमधील पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी खेळवला जाऊ शकतो. आशिया चषक स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार असून त्यानंतर अव्वल चार संघांमध्ये सामने होणार आहे. अशा स्थितीत साखळी फेरीनंतर टॉप-4मध्येही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो. याशिवाय दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला तर त्या स्थितीत तिसरा सामना पाहायला मिळेल.

बांगलादेशसमोर भारतीय फलंदाजांचे लोटांगण, 40 धावांनी पराभव

2023 आशिया कपचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र, दोन गोष्टी ठरल्या आहेत, पहिली म्हणजे यावेळी आशिया चषक हा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवला जाईल, ज्यामध्ये चार सामने पाकिस्तानमध्ये आणि 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील. दुसरीकडे, ही स्पर्धा 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube