44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाचा सुवर्ण पराक्रम, चीनला हरवत आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास

जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने गतविजेत्या चीनचा 1-0 असा पराभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 02T192813.356

India wins gold in hockey after 44 years : भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये इतिहास रचत तब्बल 44 वर्षांनंतर सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने गतविजेत्या चीनचा 1-0 असा पराभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. यापूर्वी 1982 मध्ये नवी दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर प्रथमच भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे.

जपानमधील काकामिगाहारा येथील गिफू प्रिफेक्चरल ग्रीन स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. या सामन्यात भारताकडून 200 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या लालरेमसियामीने संघाला विजयाची आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 10 व्या मिनिटाला साक्षी राणाने दिलेल्या अचूक पासवर लालरेमसियामीने जोरदार टोमहॉक शॉट मारत चेंडू थेट गोलपोस्टमध्ये धाडला. या गोळीमुळे भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आणि अखेरपर्यंत ती कायम राखली.

‘भाईला काही येवो अगर न येवो फॅशन सेन्स जबरदस्त आहे’, अभिजित दीपके यांची पंतप्रधान मोदींवर जहरी टीका

पहिल्या क्वार्टरमधील या गोलनंतर चीनने सामन्यात पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. दुसऱ्या क्वार्टरच्या 22 व्या मिनिटाला चीनला पेनल्टी स्ट्रोकची संधी मिळाली. चीनच्या झांग यिंगने घेतलेला पेनल्टी स्ट्रोक भारतीय गोलरक्षक सविता पुनियाने अप्रतिम झेप अडवला. सविताचा हा शानदार बचाव सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. लालरेमसियामीने गोल आणि सविताचा निर्णायक सेव्ह यामुळे भारताने अखेरपर्यंत आघाडी कायम ठेवत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.

भारतीय महिला हॉकी संघासाठी हे यश विशेष महत्वाचं मानले जात आहे. टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये ऐतिहासिक चौथे स्थान मिळवल्यानंतर संघाला पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्रता मिळवता आली नव्हती. मात्र, गेल्या काही महिन्यांत संघाने दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय संघाने प्रथम एफआयएच प्रो लीगमध्ये पुनरागमन केले, त्यानंतर विश्वचषकात पाचवे स्थान पटकावले आणि आता आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकून आपली ताकद पुन्हा सिद्ध केली आहे.

Asian Games 2026: सुवर्णपदकाची ‘हॅटट्रिक’ ! भारतीय बॉक्सरांनी दिवस गाजविला

या सुवर्णपदकासह भारतीय महिला हॉकी संघाने केवळ 44 वर्षांचा दुष्काळ संपवला नाही, तर लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीटही निश्चित केले आहे. त्यामुळे भारतीय महिला हॉकीसाठी हा विजय ऐतिहासिक आणि भविष्यातील मोठ्या यशाची नांदी मानला जात आहे.

follow us