Gautam Gambhir: विराटच नव्हे, तर कॅप्टन कूल धोनीलाही डिवचले, भारतीय संघातील खेळाडूचा गौप्यस्फोट

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 05T123425.156

Gautam Gambhir Virat Kohli Clash : सध्या सुरु असणाऱ्या आयपीएल (IPL) स्पर्धेत खेळाडूंच्या कामगिरीची जोरदार चर्चा सुरु आहे, आणि त्यासोबतच खेळाडूंच्या वादाची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. खेळाडूंमध्ये सतत होत असणारे मतभेद थेट क्रिकेटच्या मैदानात दिसून येत आहेत. त्यामुळे मैदानात नव्हे तर मैदानाच्या बाहेर कोणाचा खरा वैरी कोण आहे, यावरून जोरदार चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात मैदानात बाचाबाची झाली.

विराट आणि गौतम या दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे दिसून येत आहे. याअगोदर देखील या दोघांमध्ये असा प्रकार बघायला मिळाला होता. कारण गंभीरने सतत वक्तव्यांच्या माध्यमातून विराटवर जोरदार निशाना साधत असल्याचा दिसून येत आहे. विराट मात्र यावर कधीही प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे आला नाही. परंतु, ही ठिणगी मात्र खूप दिवसापासून जोरदार चर्चा होत आहे. अखेर लखनऊ विरुद्ध बंगळुरूच्या सामन्यामध्ये या ठिणगीचा वणवा पेटला आहे. आता तुम्ही म्हणाल विराट आणि गौतमचा वाद फारच मोठा होत चाला आहे.

परंतु मुळात तस काही नाही. कारण आतापर्यंत क्रिकेट कारकिर्दीत त्याने इतर कोणत्याही खेळाडूंशी हुज्जत घातल्याचे बघायला मिळालं. यामध्ये महेंद्रसिंह धोनीबरोबरच इतर खेळाडूंच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियात माजी खेळाडू इरफान पठान याने याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. बुधवारी चेन्नई आणि लखनऊ यांच्यात सामना पाऊसामुळे रद्द करण्यात आला होता, प्रेझेंटर म्हणून इरफानने ते दिवस आठवले. जेव्हा गंभीरकडे कोलकाता नाईट रायडर्सया संघाची धुरा होती.

SRH vs KKR : रिंकू आणि नितीशची धडाकेबाज खेळी, कोलकाताचे हैदराबादसमोर 172 धावांचे लक्ष्य

२०१६ मध्ये त्याचा संघ त्यावेळी धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्स विरोधामध्ये मैदानात उतरला होता. त्यावेळी माहीला रोखण्यासाठी गौतम गंभीरने रणनिती आखण्यात आली होती. जी बऱ्यावेळा प्रभावी ठरली होती. गंभीरने नेमकं काय केले होते? याविषयी सागत असताना धोनी प्रत्येक वेळेस फलंदाजीसाठी मैदानात येत होता, तेव्हा गौता, गंभीर हा कसोटी क्रिकेटसारखी फिल्डिंग लावत असत. यावेळी तो सुनील नरीन, पियुष चावला या खेळाडूंना गोलंदाजीसाठी उतरवत होता. तेव्हा प्रत्येकवेळस धोनी वैतागला होता, असे तो यावेळी म्हणाला आहे.

wrestlers Protest : दिल्ली पोलिसांच्या धक्काबुक्कीनंतर कुस्तीपटू आक्रमक, सरकारला पदकं माघारी देण्याची धमकी

तसेच कोलकाता संघाच्या कर्णधारपदी असताना गंभीरने सतत धोनीच्या अहंकाराचा मोठा धक्का दिला आहे. तो एक असा खेळाडू होता, गेल्या अनेक वर्षे धोनीच्या डोक्याला मोठा ताप वाढवला होता. असं म्हणत गंभीरने शांत राहून देखील कशा प्रकारे धोनीला डिवचले जात होते. हा प्रसंग क्रिकेटप्रेमींसमोर आला होता. या साऱ्यावर धोनीची काय प्रतिक्रिया असणार हे तुम्हाला देवही चांगलंच माहिती आहे. परंतु मैदानातील वाद आता चांगलच चव्हाट्यावर येत आहे.

Tags

follow us