ऋषभ पंत नाही, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘हा’ खेळाडू होणार भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार

India vs South Africa ODI :  भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सध्या दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण

  • Written By: Published:
India Vs South Africa ODI

India vs South Africa ODI :  भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सध्या दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे मात्र या मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला दुखापत झाल्याने तो या मालिकेत खेळताना दिसणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे या मालिकेसाठी बीसीसीआय कर्णधार पदाची जबाबदारी कोणत्या खेळाडूवर टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच एक मोठी अपडेट समोर आली आहे.

या अपडेटनुसार, ऋषभ पंत (Rishabh Pant) किंवा रोहित शर्माकडे (Rohit Sharma) भारतीय संघाचे नेतृत्व जाणार नाही. बीसीसीआय (BCCI) या मालिकेसाठी के.एल. राहुलकडे (KL Rahul) भारतीय संघाचा नेतृत्व देण्याचा विचार करत आहे. मीडिया अहवालानुसार, शुभमन गिलच्या मानेला झालेल्या दुखापतीमुळे अनुपलब्धता लक्षात घेता, भारतीय फलंदाज केएल राहुल 30 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करु शकतो असा दावा बीसीसीआयच्या सूत्रानुसार मीडिया अहवालात करण्यात आला आहे.

भारतीय कर्णधार शुभमन गिलला कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना मानेला दुखापत झाली होती. तर दुसरीकडे भारतीय संघाचा एकदिवसीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर देखील दुखापतीमुळे संघाबाहेर असल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुलकडे भारतीय संघाचा नेतृत्व जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Parliament Winter Session : संसदेत मोदी सरकार मांडणार दहा नवीन विधेयके; पहा संपूर्ण यादी

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 29 नोव्हेंबर रोजी रांची येथे पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे तर या मालिकेतील दुसरा सामना 3 डिसेंबर रोजी रायपूर आणि विझाग येथे 6 डिसेंबर रोजी या मालिकेतील तिसरा सामना होणार आहे.

follow us