MI-W vs UPW-W: एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सची मिडिल ऑर्डर पुन्हा फ्लॉप होणार का?, काय सांगते आकडेवारी…
मुंबई : महिला प्रीमियर लीग 2023 चा प्लेऑफ सामना आज (24 मार्च) होणार आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर हा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सच्या महिला संघांमध्ये होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या टीम मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकून फायनलचे तिकीट काढायचे आहे. त्याचबरोबर यूपी वॉरियर्सचा संघही अंतिम फेरी गाठण्यासाठी पूर्ण ताकद लावेल. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या महिला संघाने या स्पर्धेत यूपी वॉरियर्सपेक्षा चांगली कामगिरी केली हे खरे आहे. पण यूपी संघाच्या तुलनेत मुंबई इंडियन्सची मधली मिडिल ऑर्डर फ्लॉप आहे हे तितकेच खरं आहे. प्लेऑफच्या सामन्यात मुंबई संघाची ही उणीव पुन्हा उघड झाली, तर त्याचा अंतिम फेरीचा मार्ग कठीण होईल. दोन्ही संघांच्या मिडिल ऑर्डरबद्दल जाणून घेऊया…
यूपी वॉरियर्सची मिडिल ऑर्डर मजबूत
महिला प्रीमियर लीगबद्दल बोलायचे तर, यूपी वॉरियर्सच्यामिडिल ऑर्डरने मुंबई इंडियन्सपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. यूपी संघाने महिला IPL 2023 मध्ये 8 सामन्यात एकूण 1161 धावा केल्या. या 1161 धावांपैकी 663 धावा चौथ्या क्रमांकापासून ते सातव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी केल्या. महिला प्रीमियर लीगमध्ये कोणत्याही संघाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. यादरम्यान ताहलिया मॅकग्रा आणि ग्रेस हॅरिस यांनी अप्रतिम फलंदाजी करताना 200 हून अधिक धावा केल्या.
Who is Purnesh Modi : राहुल गांधींची खासदारकी घालवणारे पूर्णेश मोदी कोण ?
मुंबई इंडियन्सची मिडिल ऑर्डर ढासळली
यूपी वॉरियर्सविरुद्ध मुंबई इंडियन्सची मिडिल ऑर्डर डळमळीत राहिली. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 8 सामन्यात एकूण 1119 धावा केल्या आहेत. या 1119 धावांपैकी मधल्या फळीतील फलंदाजांनी 464 धावा केल्या. मुंबईसाठी मधल्या फळीत फक्त हरमनप्रीत कौर आणि अमेलिया केर यशस्वी ठरल्या. याशिवाय पूजा वस्त्राकर आणि इस्सी वाँग यांनी काही धावा केल्या. मुंबई इंडियन्सची टॉप ऑर्डर जेव्हा अपयशी ठरली तेव्हा बहुतेक संघ सामना हरल्याचे या स्पर्धेत अनेकदा दिसून आले आहे.