टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ भारतीय खेळाडूंविषयी : सचिन, राहुल कितव्या स्थानी?

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ भारतीय खेळाडूंविषयी : सचिन, राहुल कितव्या स्थानी?

Most Man Of The Match In Test Cricket For India: भारतीय कसोटी संघ गेल्या काही काळापासून अत्यंत खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. भारतीय संघ नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. टीम इंडिया यापूर्वी 2021 टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचली होती, जिथे टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचनिमित्ताने, भारतीय संघासाठी आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार कोणी जिंकले आहेत हे जाणून घेऊया.

सचिन तेंडुलकर: भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकण्याचा विक्रम माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. दिग्गज तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत 200 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने एकूण 14 ‘सामनावीर’ किताब जिंकले.

600 गाड्यांच्या ताफ्यासह बीआरएसचं वादळ सोलापूरच्या दिशेने; महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठे धक्के बसणार?

राहुल द्रविड: यादीत दुसऱ्या क्रमांकावर माजी भारतीय खेळाडू आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा समावेश आहे. द्रविडने आपल्या कारकिर्दीत 163 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 11 वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’चा किताब पटकावला आहे.

विराट कोहली : सध्याचा भारतीय फलंदाज विराट कोहली या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 109 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 10 वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार पटकावला आहे.

‘त्यावेळी ते प्राथमिक शाळेत असतील’; पवारांनी उडवली फडणवीसांच्या वक्तव्याची खिल्ली

अनिल कुंबळे: भारताचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे भारतासाठी आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकणाऱ्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. आपल्या कारकिर्दीत १३२ कसोटी सामने खेळणारा अनुभवी कुंबळे १० वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला आहे.

आर अश्विन: टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘मॅन ऑफ द मॅच’ जिंकण्याच्या बाबतीत सध्याचा फिरकी गोलंदाज आर अश्विन पाचव्या क्रमांकावर आहे. अश्विनने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 92 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 9 ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube