नवी दिल्ली : पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीची (Shahid Afridi) दुसरी मोठी मुलगी अंशासोबत (Ansha Afridi) कराचीमध्ये विवाह केला. या दोघांच्या लग्नाला अनेकांनी हजेरी लावली होती. शाहीनच्या लग्नात पाकिस्तानचे अनेक दिग्गज खेळाडूही तिला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. याआधी, शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी अक्षाचेही गेल्या वर्षाच्या अखेरीस 30 […]
मुंबईः भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) हा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. आता त्याच्याविरोधात पत्नी एंड्रिया हेविट (Andrea Hewitt) हिला दारूच्या नशेत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबईतील बांद्रा पोलिस (Bandra Police) ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात कलम ३२४ आणि ५०४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. […]
नवी दिल्ली : आशिया कप 2023 पाकिस्तानात होणार होता. मात्र आता या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी आधीच सांगितले होते की, टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही. याबाबत नुकतीच आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक झाली, ज्यामध्ये पीसीबीचे अधिकारीही सहभागी झाले होते. रिपोर्ट्सनुसार, आता आशिया कप […]
मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) याची पत्नी जया भारद्वाजबाबत (Jaya Bhardwaj) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जयासोबत 10 लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली असून तिला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या एका माजी अधिकाऱ्याने त्यांच्यासोबत ही फसवणूक केली आहे. दीपक चहरच्या वडिलांनी याप्रकरणी माजी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा […]
नागपूर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारतात पोहोचला असतानाच भारतीय संघातील खेळाडूही नागपुरात सराव करत आहेत. श्रेयस अय्यरच्या नागपूर कसोटी सामन्यातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. खरं […]
नवी दिल्ली : 2007 सालच्या विश्वचषक भारताला जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या जोगिंदर शर्माने आज म्हणजेच 3 फेब्रुवारी रोजी वयाच्या 39 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमध्ये मिसबाह-उल-हकची विकेट घेऊन भारताला विजेतेपद मिळवून देताना जोगिंदर शर्माचा तो चेंडू आजही सर्वांच्या मनात ताजा असेल. जोगिंदर शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. जोगिंदरने […]