DC vs RCB: कोहली, फाफ आणि लोमररची धुवाधार फलंदाजी, RCB चे दिल्लीसमोर 182 धावांचे लक्ष्य
DC vs RCB: आयपीएल 2023 चा 50 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिसने 10 षटकांत एकही विकेट पडू दिली नाही. आरसीबीने 20 षटकांत 4 गडी गमावून 181 धावा केल्या. दिल्लीला या मोसमातील चौथा विजय मिळवायचा असेल तर त्यांना 182 धावा कराव्या लागतील.
मॅक्सवेलचे खाते उघडले नाही
विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांच्यात पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी झाली. 11व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बंगळुरूला पहिला धक्का बसला. मिचेल मार्शने फाफला अक्षर पटेलकडे झेलबाद केले. आरसीबीच्या कर्णधाराने 32 चेंडूत 45 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. पुढच्याच चेंडूवर आरसीबीची दुसरी विकेट पडली. मॅक्सवेल गोल्डन डकचा बळी ठरला. मार्शने त्याला सॉल्टकरवी झेलबाद केले.
मुख्यमंत्र्यांच्या कृतीने मराठी मन दुखावले; रोहित पवारांचा शिंदेंवर हल्लाबोल
विराटने अर्धशतक ठोकले
कोहली आणि महिपाल यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी झाली. 16व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आरसीबीची तिसरी विकेट पडली. चांगली फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीला मुकेशने पॅव्हेलियन पाठवले. किंग कोहलीने 46 चेंडूत 55 धावांची खेळी केली. आयपीएलमधील विराटचे हे 50 वे अर्धशतक आहे. शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दिनेश कार्तिक झेलबाद झाला. खलीलने दिल्लीला चौथे यश मिळवून दिले. कार्तिकने 9 चेंडूत 11 धावा केल्या. अनुज रावत 8 आणि महिपाल 54 धावा करून नाबाद राहिला.