शुभमन गिलच्या कॅच वादाची पुनरावृत्ती, आणखी एक फलंदाज टीव्ही अंपायरचा शिकार, पाहा व्हिडिओ

  • Written By: Published:
शुभमन गिलच्या कॅच वादाची पुनरावृत्ती, आणखी एक फलंदाज टीव्ही अंपायरचा शिकार, पाहा व्हिडिओ

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये शुभमन गिलला वादग्रस्त बाद करण्यात आले. ज्यानंतर बराच वाद झाला होता. वीरेंद्र सेहवाग, आकाश चोप्रा यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी शुभमन गिलला बाद करण्यावर आक्षेप घेतला. मात्र, शुभमन गिलचा वाद थंडावला असला तरी आता तमिळनाडू प्रीमियर लीगमध्येही असेच प्रकरण पाहायला मिळाले आहे. वास्तविक, तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये ज्याप्रकारे खेळाडूला आऊट करण्यात आले, त्यामुळे चाहत्यांना शुभमन गिलची आठवण झाली.(shubman-gill-catch-controversy-recreated-in-tnpl-here-watch-viral-video-and-know)

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये मंगळवारी नेल्लई रॉयल किंग्ज आणि ड्रीम तिरुपूर तमिझन हे संघ आमनेसामने होते. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेला ड्रीम तिरुपूर तमिझनचा संघ अवघ्या 124 धावांत गारद झाला. त्याचवेळी, प्रत्युत्तरात नेल्लई रॉयल किंग्जने 18.2 षटकांत 7 गडी गमावून लक्ष्य गाठले, परंतु लक्ष्मीेश सूर्यप्रकाशच्या बाद करण्याच्या पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भुवनेश्वरनने लक्ष्मेश सूर्यप्रकाशचा झेल पकडला, मात्र या झेलवरून वाद सुरू झाला आहे. वास्तविक, अनेक चाहत्यांचे असे मत आहे की, भुवनेश्वरनने लक्ष्मेश सूर्यप्रकाशचा झेल व्यवस्थित पकडला नाही, पण तरीही टीव्ही अंपायरने त्याला आऊट घोषित केले.

सोशल मीडियावर चाहत्यांना शुभमन गिलचा झेल आठवतोय…

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये लक्ष्मेश सूर्यप्रकाशानंतर चाहत्यांना, शुभमन गिलच्या वादाची आठवण झाली. लोक लक्ष्मेश सूर्यप्रकाशच्या झेल ची तुलना शुभमन गिलच्या झेलशी करत आहेत. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube