पाकिस्तानचा संघ जाहीर झाला पण, झटका बसलाच; ‘या’ खेळाडूने नाकारली मोठी ऑफर

पाकिस्तानचा संघ जाहीर झाला पण, झटका बसलाच; ‘या’ खेळाडूने नाकारली मोठी ऑफर

Shaheen Afridi rejects vice captaincy offer : टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी शुक्रवारी पाकिस्तान संघाची घोषणा (Pakistan Cricket) झाली. पाकिस्तान वगळता सर्वच संघांनी मे महिन्याच्या सुरुवातीला आणि मध्यावर संघाची घोषणा केली होती. परंतु पाकिस्तानने मात्र संघाची घोषणा करण्यासाठी खूप वेळ घेतला. इंग्लंडविरुद्ध टी 20 क्रिकेट मालिका सुरू असताना 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा बाबर आझमकडे सोपवले (Babar Azam) गेले. संघाच्या उपकर्णधार पदासाठी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीला विचारणा (Shaheen Afridi) करण्यात आली होती परंतु आफ्रिदीने स्पष्ट शब्दांत नकार दिल्याची माहिती मिळाली आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने आगामी विश्वचषकासाठी शाहीन अफ्रिदिकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्याचा विचार केला होता. परंतु आफ्रिदीने ही ऑफर नाकारली आहे. त्यामुळेच पाकिस्तानने जेव्हा आपल्या संघाची घोषणा केली त्यावेळी उपकर्णधार पदासाठी कुणाचेही नाव सांगितले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

Pakistan Cricket मध्ये कर्णधार पदावरून वातावरण तापलं; उचलबांगडी केल्यामुळे आफ्रिदी नाराज

मागील वर्षी बाबर आझमने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या या निर्णयानंतर शाहीन आफ्रिदीला कर्णधार करण्यात आले होते. अफ्रिदीच्या नेतृत्वात संघाला न्युझीलंडविरुद्धच्या टी 20 मालिकेत नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच पाकिस्तानातील लीग स्पर्धेतही शाहीन अफ्रिदीच्या नेतृत्वातील संघाला 10 पैकी फक्त एक सामन्यात विजय मिळवता आला होता.

यानंतर शाहीन अफ्रिदीच्या कप्तानीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी सुद्धा संघाचा कर्णधार बदलण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. या घडामोडींनंतर काही दिवसांनी बाबर आझमला पुन्हा कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे आता आगामी विश्वचषक स्पर्धेत बाबर आझम पाकिस्तान संघाचे नेतृत्व करताना दिसेल. दरम्यान या घडामोडी ज्या पद्धतीने घडल्या त्यावर शाहीन आफ्रिदी नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. कर्णधारपद काढून घेतल्याने शाहीन आफ्रिदी नाराज आहे अशा बातम्या काही माध्यमात आल्या आहेत.

T20 World Cup 2024 साठी पाकिस्तानचा संघ जाहीर, ‘या’ स्टार खेळाडूला पुन्हा संधी

दरम्यान, पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) पाकिस्तानने (Pakistan) आपला संघ जाहीर केला आहे. पुढील महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बाबर आझमकडे (Babar Azam) कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचा पहिला सामना 6 जून रोजी यजमान यूएसए विरुद्ध होणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात 9 जून रोजी पाकिस्तान भारतीय संघाशी भिडणार आहे. 11 जून रोजी पाकिस्तान आपला तिसरा सामना कॅनडा विरुद्ध खेळणार आहे. तर 16 जून रोजी आयर्लंड विरुद्ध पाकिस्तानचा सामना होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube