धक्कादायक! माजी क्रिकेटपटूवर बिबट्याचा हल्ला; पाळीव कुत्र्याच्या मदतीने वाचला जीव

धक्कादायक! माजी क्रिकेटपटूवर बिबट्याचा हल्ला; पाळीव कुत्र्याच्या मदतीने वाचला जीव

Leopard Attack on former cricketer Guy Whittall : झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी खेळाडून गाय व्हिटलवर बिबट्याने (Guy Whittall) हल्ला केल्याची बातमी आहे. या हल्ल्यात तो जखमी झाला असून त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. पुढील उपचारासाठी एअरलिफ्टद्वारे गाय व्हिटलला हरारे येथे नेण्यात आले. गाय व्हिटलची पत्नी हॅना स्टोक्सने ही माहिती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली.

या पोस्टमध्ये तिने रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच या हल्ल्यात गाय व्हिटलच्या शरीरातून खूप रक्तस्त्राव झाल्याचेही सांगितले. गाय व्हिटलच्या पत्नीने हल्ला झाल्यानंतरचा आणि दवाखान्यात उपचार घेत असल्याचा असे दोन फोटो जोडले शेअर केले आहेत. गाय व्हिटलनर ट्रेकिंग करत होता. नेमक्या याच वेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. पण आपल्या पाळीव कुत्र्याच्या मदतीने कसेतरी प्रयत्न करून जीव वाचविण्यात त्याला यश मिळाले.

T20 World Cup : राहुल, संजू, ऋषभ अन् कार्तिक; कुणाला मिळणार संधी? लवकरच घोषणा

याआधीही त्याला वन्यप्राण्यांचा सामना करावा लागला आहे. 2013 मध्ये झिम्बाब्वेतील हुमनी लॉजमध्ये त्याच्या पलंगाखाली 8 फूट लांबीची मगर आढळली होती. दीडशे किलो वजनाची ही मगर कुणाच्याही लक्षात न येता आत गेली आणि रात्रभर तिथेच पडून होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मोलकरणीने आरडाओरडा केल्यानंतर हा प्रकार सगळ्यांच्या लक्षात आला.

असे होते क्रिकेटमधील करिअर

गाय व्हिटल दहा वर्षे झिम्बाब्वे क्रिकेट संघात होता. या काळात त्याने 46 कसोटी आणि 147 एकदिवसीय सामने खेळले. 46 कसोटी सामन्यात 203 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2 हजार 207 धावा त्याच्या नावावर आहेत. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने 88 विकेट्सही घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 1993 मध्ये त्याने पदार्पण केले. त्याचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होता. याच वर्षात त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2003 मध्ये तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

Team India : वर्ल्ड टेस्ट स्पर्धेच्या फायनलमध्ये कोण? ‘या’ दोन संघांशी टीम इंडियाची टक्कर

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube