SRH vs KKR : शेवटच्या षटकात सामना उलटला, प्लेऑफच्या शर्यतीत कोलकाता कायम, हैदराबादचा पराभव
SRH vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या हंगामातील 10 पैकी चौथा सामना जिंकला आहे. यासह त्याच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशाही कायम आहेत. गुरुवारी (4 मे) झालेल्या सामन्यात कोलकाताने सनरायझर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव केला.
हा सामना अतिशय रोमांचक झाला आणि शेवटच्या चेंडूवर निकाल लागला. या विजयाचा शिल्पकार स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्ती होता. शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 9 धावांची गरज होती. तरी देखील वरुणने केवळ 3 धावा देऊन हैद्राबारला विजय मिळून दिला.
या सामन्यात हैदराबादचा संघ 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, मात्र 8 विकेट्सवर 166 धावाच करू शकला. संघाकडून कर्णधार एडन मार्करामने सर्वाधिक 41 धावा केल्या. तर हेनरिक क्लासेनने 36 धावांची खेळी केली. कोलकाताकडून वैभव अरोरा आणि शार्दुल ठाकूर यांनी 2-2 बळी घेतले. हर्षित राणा, आंद्रे रसेल, अनुकुल रॉय आणि वरुण चक्रवर्ती यांना 1-1 विकेट मिळाली.
रिंकू सिंग आणि नितीश यांची उत्तम बॅटिंग
हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर संघाला 9 गडी गमावून केवळ 171 धावा करता आल्या. केकेआर संघाकडून रिंकू सिंगने 35 चेंडूत 46 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. तर कर्णधार नितीश राणाने 31 चेंडूत 42 धावा केल्या. हैदराबाद संघाकडून मार्को जॅनसेन आणि टी नटराजन यांनी 2-2 बळी घेतले.
या मोसमातील कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील हा दुसरा सामना आहे. याआधी 14 एप्रिल रोजी दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता, ज्यामध्ये हैदराबाद संघाने 23 धावांनी विजय मिळवला होता. अशा स्थितीत कोलकाता संघ हा सामना जिंकून स्कोअर सेट करण्यासाठी आला आहे.