भारतीय संघाला दुसरा दणका! ICC चा नियम आला अडवा; खेळाडूंवर केली ‘ही’ कारवाई

भारतीय संघाला दुसरा दणका! ICC चा नियम आला अडवा; खेळाडूंवर केली ‘ही’ कारवाई

IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान टी 20 सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला. विंडीज संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या पराभवातून सावरत असतानाच टीम इंडिया दुसरा धक्का बसला आहे. पहिला टी 20 सामना संपल्यानंतर आयसीसीने दोन्ही संघांवर कारवाई केली. दोन्ही संघ निर्धारीत वेळेत 20 ओव्हर टाकू शकले नाहीत. भारतीय संघाने 1 तर वेस्टइंडिज संघाने 2 ओव्हर उशिराने टाकल्या. त्यामुळे आयसीसीने भारतीय खेळाडूंवर मॅच फीच्या पाच टक्के तर वेस्टइंडिज खेळाडूंवर मॅच फीच्या 10 टक्के दंड आकारला. सामना संपल्यानंतर सामन्याचे रेफ्री रिची रिचर्डसन या कारवाईची माहिती दोन्ही संघाच्या कर्णधारांना दिली.

नॅचरली करप्ट पार्टी म्हणता मग सत्तेत का घेतले ? सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल

नियम नेमका काय ?

आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, निर्धारीत वेळेत जर ओव्हर पूर्ण केल्या नाहीत तर स्लो ओव्हरसाठी मॅच फीच्या 5 टक्के दंड आकारला जातो. हा दंड 50 टक्क्यांपर्यंतही असू शकतो. या कारवाईनंतर भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि वेस्टइंडिजचा कर्णधार रोमेन पॉवेल यांनी या दंडाचा स्वीकार केला.

पराभवाने टीम इंडियाची सुरुवातच

पहिल्या टी 20 सामन्यात या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडिज संघाने 150 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला फक्त 145 धावा करता आल्या. या सामन्यात विंडीज संघाने जबरदस्त फलंदाजी केली. पहिल्या पावर प्ले मध्ये संघाचे 54 रन झाले होते. भारतीय गोलंदाज निष्प्रभ दिसत होते. या सामन्यात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल दोघेही होते. मात्र ते फार काही करू शकले नाहीत. कुलदीपने 4 ओव्हरमध्ये 20 रन देत एक विकेट मिळवली. चहलला दोन विकेट मिळाल्या.

IND vs WI : टीम इंडिया सुसाट! तिसऱ्या वनडेत मोठा विजय, मालिकाही जिंकली

भारतीय संघाकडून तिलक वर्मा याने शानदार फलंदाजी केली. त्याने 22 चेंडूत 39 धावांची खेळी केली. या सामन्यात तो चांगल्या स्ट्राइक रेटने फलंदाज ठरला. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. सलामीवर शुभमन गिल आणि इशान किशन फेल ठरले. त्यामुळे संघाला आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube