अंडर 19 वनडेमध्ये इंडियाची विजयी सलामी; यूएई’चा तब्बल 234 धावांनी धुव्वा उडवला

यूएईची विजयी धावांचा पाठलाग करताना 6 आऊट 53 अशी स्थिती झाली होती. वैभव सूर्यंवशी याने केलेल्या 171 धावांच्या जोरावर टीम इंडियाचा विजय.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 12T203624.463

आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात अंडर 19 टीम इंडियाने वनडे आशिया कप 2025 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक असा विजय साकारला आहे. (India) टीम इंडियाने यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीचा तब्बल 234 धावांनी धुव्वा उडवला आहे. वैभव सूर्यंवशी याने केलेल्या 171 धावांच्या जोरावर टीम इंडियाने यूएईसमोर 434 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर यूएईला 200 धावांपर्यंतही पोहचता आलं नाही.

यूएईने पूर्ण 50 ओव्हर खेळून काढल्या. यूएईने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 199 धावा केल्या. भारतासाठी 171 धावा करणारा वैभव सूर्यवंशी मॅन ऑफ द मॅच ठरला. यूएईची विजयी धावांचा पाठलाग करताना 6 आऊट 53 अशी स्थिती झाली होती. मात्र पृथ्वी मधू, उद्दीश सुरी आणि सालेह अमीन या त्रिकुटाने या तिघांनी संघर्ष केला. या तिघांना यूएईला जिंकून देणं जमलं नाही. मात्र या तिघांनी तीव्र प्रतिकार केला. यूएईसाठी पृ्थ्वीने 87 बॉलमध्ये 50 रन्स केल्या. तर उद्दीश आणि सालेह या जोडीने सामना संपेपर्यंत आठव्या विकेटसाठी 74 बॉलमध्ये 61 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली.

follow us