2027 वर्ल्डकप माझा शेवटचा असेल; विराट कोहली म्हणाला, ‘ट्रॉफीसाठी सर्वस्व पणाला लावणार’
Virat Kohli On 2027 World Cup: विराट कोहलीने 2027 वनडे वर्ल्डकप आपला शेवटचा वर्ल्डकप असेल, असं म्हटलं आहे.
Virat Kohli On 2027 World Cup: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) 2027 मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपबाबत मोठं विधान केलं आहे. भारताकडून खेळताना पुढील वनडे वर्ल्डकप (ODI World Cup) आपल्यासाठी अखेरचा असेल, असं कोहलीने म्हटलं. या स्पर्धेत भारताला वर्ल्डकप मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेली मेहनत आणि त्याग करण्याची पूर्ण तयारी असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी (West Indies ODI) कोहलीने ही भूमिका मांडली.
UNGAमध्ये जयशंकरांचा पाकिस्तानला थेट इशारा; ‘दहशतवादाविरोधात झीरो टॉलरन्स’ कायम
‘वर्ल्डकप जिंकणं हेच माझं सर्वात मोठं लक्ष्य’
कोहलीने भारताकडून खेळताना हा त्याचा शेवटचा वर्ल्डकप असण्यायाची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे मैदानावर पूर्ण ताकदीने उतरण्याची आणि संघाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व करण्याची तयारी असल्याचं त्याने सांगितलं.
वनडे वर्ल्डकप जिंकणं हे क्रिकेटमधील अत्यंत कठीण आव्हान असल्याचंही कोहलीने सांगितलं. विशेषतः आपल्या देशाबाहेर ही स्पर्धा खेळताना परिस्थिती आणखी आव्हानात्मक ठरते, असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे आगामी स्पर्धेसाठी मेहनत, त्याग आणि सातत्य या गोष्टी महत्त्वाच्या असतील, असं त्याने स्पष्ट केलं.
2026 मध्ये विराटची दमदार कामगिरी
2026 मध्ये आतापर्यंत विराट कोहलीने सहा वनडे सामन्यांमध्ये 64.00च्या सरासरीने 384 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतकं आहेत. गेल्या 10 वनडे सामन्यांमध्येही कोहलीने तीन शतकं आणि पाच अर्धशतकं झळकावली आहेत.
महाराष्ट्रात दुष्काळ, तर गडचिरोलीत पुराचा तडाखा; 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला
वनडे क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर 54 शतकं आहेत. त्याने आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये 14,941 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या यादीत सचिन तेंडुलकर 18,426 धावांसह आघाडीवर आहे. कोहलीने यापूर्वी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
2027 च्या वनडे वर्ल्डकपचं आयोजन दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांमध्ये होणार आहे. या स्पर्धेकडे कोहलीच्या वनडे कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिलं जात आहे.
शुभमन गिलबाबत विराटची भूमिका काय?
याच संवादात विराट कोहलीने शुभमन गिलच्या नेतृत्वाबाबतही भाष्य केलं. गिलसाठी कर्णधारपदाची भूमिका नवीन असली तरी टीम इंडियाचं नेतृत्व करण्यासाठी आवश्यक गुण त्याच्याकडे असल्याचं कोहलीने सांगितलं.
परराज्यातील टोळीने कृषी सेवा केंद्रही सोडले नाही; काही तासांत टोळी गजाआड
गिलकडे मैदानावर योग्य निर्णय घेण्याची आणि उपलब्ध खेळाडूंचा प्रभावी वापर करण्याची स्पष्ट योजना असल्याचं कोहलीने नमूद केलं. संघाला एका दिशेने घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेली आक्रमकता आणि सकारात्मक वृत्तीही त्याच्याकडे असल्याचं विराटने सांगितलं.
2027 चा वनडे वर्ल्डकप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या वक्तव्यामुळे त्याच्या वनडे भवितव्याबाबतची चर्चा पुन्हा रंगली आहे.