कुस्ती संघटनेच्या निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल, ब्रिजभूषण सिंगच्या जागी WFI ला मिळणार नवा अध्यक्ष
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कुस्ती महासंघ (WFI) निवडणुकीच्या तारखा बदलल्या आहेत. याआधी कुस्ती महासंघाच्या निवडणुका 6 जुलैला होणार होत्या, मात्र आता या निवडणुका 11 जुलैला होणार आहेत. आयओएच्या समितीने पाच अवैध राज्य घटकांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणुकांच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.(wfi-elections-2023-ioa-changes-date-of-wrestling-federation-of-india-elections-now-polling-will-held-on-11-july)
कुस्ती महासंघाच्या निवडणुकीचा निकालही 11 जुलैलाच जाहीर होणार आहे. महाराष्ट्र, हरियाणा, तेलंगणा, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या पाच राज्यांनी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एमएम कुमार यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीकडे संपर्क साधला. या पाच जणांना WFI कडून मान्यता मिळालेली नाही.
कुस्ती महासंघाच्या निवडणुकीची तारीख बदलली
समितीने त्यांना बुधवारी (21 जून) सुनावणीसाठी बोलावले होते. एका सूत्राने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, राज्य घटकांनी समितीसमोर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, भारतीय कुस्ती महासंघाच्या प्रतिनिधींनी त्यांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय योग्य ठरवला आहे. समितीला निर्णय घेण्यासाठी वेळ हवा आहे, त्यामुळे आता 11 जुलै रोजी निवडणूक होणार आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन खासदार अमोल कोल्हेंचा हल्लाबोल, म्हणाले…
पैलवानांनी ठिय्या मांडला
उल्लेखनीय आहे की, कुस्ती महासंघाचे मावळते प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत देशातील प्रसिद्ध कुस्तीपटूंनी निदर्शने केली होती. यादरम्यान दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटू धरणे धरत बसले होते. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. ज्यासाठी दिल्ली पोलिसांनी दोन एफआयआर नोंदवले होते.
गेल्या आठवड्यात पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्रही दाखल केले होते. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर खेळाडूंनी आंदोलन स्थगित केले. 15 जूनपर्यंत ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याचे, खेळाडूंवर दाखल करण्यात आलेला एफआयआर मागे घेण्याचे आणि कुस्ती संघटनेच्या निवडणुका लवकरच घेण्याचे आश्वासन सरकारने खेळाडूंना दिले होते.