विंडीजचा आफ्रिकेला दणका! पहिल्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव

विंडीजचा आफ्रिकेला दणका! पहिल्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव

West Indies vs South Africa : वेस्टइंडिज दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिका (West Indies vs South Africa) संघाला पहिल्याच टी 20 सामन्यात पराभवाचा धक्का बसला. तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला मोठा (South Africa) संघर्ष करावा लागला मात्र तरीही विजय मिळवता आला नाही. वेस्टइंडिजच्या विजयात फलंदाज आणि गोलंदाज दोघांचाही वाटा राहिला.

दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब राहिली. दोन्ही सलामीच्या फलंदाजांना चौथ्या ओव्हरमध्येच तंबूत परतावे लागले. सातव्या ओव्हरपर्यंत आफ्रिकेचा निम्मा संघ बाद झाला होता. धावा फक्त 42 झाल्या होत्या. यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि पॅट्रिक क्रुगर या दोघांनी डाव सांभाळला. स्टब्सने 42 चेंडूत 76 धावा केल्या तर पॅट्रिक क्रुगरने 32 चेंडूत 44 धावा केल्या. वीस ओव्हरपर्यंत सात विकेट गमावत आफ्रिकेने 175 धावा केल्या होत्या.

West Indies out of World Cup 2023: विश्वविजेता वेस्ट इंडिज, 48 वर्षांत प्रथमच विश्वचषकातून बाहेर

वेस्टइंडिजच्या रोमारियो शेफर्ड आणि गुडाकेश मोती यांना एकही विकेट मिळाली नाही. परंतु, अकील हुसैन, मॅथ्यू फोर्ड आणि शेमार जोसेफ यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. अकील हुसैनने एक विकेट घेतली. शेमार जोसेफने दोन विकेट घेतल्या तर मॅथ्यू फोर्डने 3 विकेट्स घेतल्या. वेस्टइंडिजच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली तरीही दक्षिण आफ्रिका 175 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला.

वेस्टइंडिजच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. अॅलेक अथानाजने 30 चेंडूत 40 धावा केल्या. तर शाय होपने 36 चेंडूत 51 धावा केल्या. निकोलस पूरनने 26 चेंडूत 65 धावा केल्या. वेस्टइंडिजने 17.5 ओव्हर्समध्येच 176 धावा करत सामना जिंकला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत वेस्टइंडिजने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

आफ्रिकेचा पराक्रम! दुसऱ्या सामन्यात विंडीजचा पराभव करत मालिकाही जिंकली

दरम्यान, याआधी झालेल्या कसोटी सामन्यांची मालिका दक्षिण आफ्रिकेने जिंकली. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी (SA vs WI) सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) वेस्टइंडिजचा पराभव केला. या विजयाबरोबरच आफ्रिकेने कसोटी मालिका देखील जिंकली. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 40 धावांनी विंडीजचा (West Indies) पराभव केला. या विजयासह आफ्रिकेने 1-0 अशा फरकाने मालिका खिशात घातली. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube