World Cup 2023: मोहम्मद शमीने श्रीनाथ, झहीरला ‘वेगाने’ मागे टाकले ! ठरला सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

  • Written By: Published:
World Cup 2023: मोहम्मद शमीने श्रीनाथ, झहीरला ‘वेगाने’ मागे टाकले ! ठरला सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

IND vs SL : श्रीलंकेचा दारुण पराभव भारताने वर्ल्डकपच्या (World Cup 2023) सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह या ‘त्रिमूर्ती’ गोलंदाजांसमोर लंकेचा संघ अवघ्या 55 धावांत गारद झाला. त्यामुळे मुंबईतील सामना भारताने 302 धावांनी जिंकला आहे. भारताने लंकेसमोर 358 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) पाच; तर मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) तीन बळी घेतले आहेत.

World Cup 2023 : शमी, सिराजचे मुंबईत तुफान, ‘लंकादहन’ करत भारताची सेमीफायनलमध्ये धडक !

याचबरोबर या सामन्यात अनेक विक्रमही नोंदवले गेले आहेत. या वर्ल्डकपमध्ये भारताने सलग सात सामने जिंकण्याचा विक्रमही केला आहे. तर लंकेचा संघ वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा इतक्या कमी धावांवर गारद झाला आहे. याचबरोबर लंकेचे वर्ल्डकपमधील आव्हानही संपुष्टात आले आहे. मोहम्मद सिराजने सात षटकांत 16 धावा देत तीन, तर मोहम्मद शमीने 5 षटकांत 18 धावा देत पाच बळी घेतले आहेत. याचबरोबर शमीच्या नावावर मोठा विक्रम नोंदविला गेला आहे. वनडे वर्ल्डकपमध्ये भारताकडून सर्वाधिक सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाज ठरला आहे. शमीने 14 डावात 45 विकेट घेतल्या आहेत. त्याने जवागल श्रीनाथ व झहीर खान या दिग्गज क्रिकेटपटूंना मागे टाकले आहे. या दोन दिग्गजांनी वनडे वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी 44 विकेट घेतल्या आहेत. या सामन्यात शानदार कामगिरी करणारा शमी हा सामनावीर ठरला आहे.

World Cup 2023 : विराट, गिल, अय्यरची बॅट तळपली; भारताची 357 धावांवर मजल…

हा वर्ल्डकप शमीसाठी खास

मोहम्मद शमी सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहेत. त्याने गेल्या तीन सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही शमीने आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिली. त्याने न्यूझीलंडविरुद्ध पाच विकेट घेतल्या. त्यानंतर इंग्लंडविरुध्द चार विकेट घेतल्या आहेत. आज लंकेविरुध्दही पाच विकेटचा पराक्रम केला आहे.

वर्ल्डकपमध्ये सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज –
मोहम्मद शमी –45 विकेट्स-सामने 14
झहीर खान – 44 विकेट्स-सामने-23
जवागल श्रीनाथ – 44 विकेट्स-सामने – 34
जसप्रीत बुमराह – 33 विकेट्स-सामने – 17

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube