WTC 2023 Final : WTC फायनलवर पावसाचे सावट; सामना ड्रॉ झाल्यास कोण होणार विजेता?

WTC 2023 Final : WTC फायनलवर पावसाचे सावट; सामना ड्रॉ झाल्यास कोण होणार विजेता?

WTC 2023 Final :  कसोटी क्रिकेटचा नवा बॉस बनण्यासाठी आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे दुपारी ३ वाजल्यापासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या महान सामन्यावर पावसाचे सावट आहे. मात्र, आयसीसीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. अंतिम सामना अनिर्णित राहिला किंवा रद्द झाला तर चॅम्पियन कोण होणार हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे.

7 ते 11 जून दरम्यान खेळल्या जाणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पावसाचा अंदाज आहे. मात्र, सुरुवातीचे दोन दिवस हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे. मात्र, आयसीसीने १२ जून हा दिवस राखीव ठेवला आहे. तरीही सहा दिवसांतही सामन्याचा निकाल लागला नाही, तर कोणाला विजेता घोषित करणार, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

Box Office Collection : ‘जरा हटके जरा बचके’चा दबदबा, चित्रपटानं पाचव्या दिवशी केली कोटींची कमाई

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना अनिर्णित राहिला तर एक संघ नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. म्हणजेच ट्रॉफी दोन्ही संघांमध्ये वाटली जाईल. दुसरीकडे, विजेतेपदाचा सामना बरोबरीत सुटला तरी दोन्ही संघ संयुक्तपणे चॅम्पियन बनतील. आयसीसीच्या नियमांनुसार, जेव्हा आयसीसी चॅम्पियनशिप किंवा स्पर्धेचा अंतिम ड्रॉ आयोजित केला जातो तेव्हा दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाते.

Box Office Collection : ‘जरा हटके जरा बचके’चा दबदबा, चित्रपटानं पाचव्या दिवशी केली कोटींची कमाई

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून टीव्हीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. त्याचबरोबर विजेतेपदाच्या सामन्याचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे. याशिवाय डिस्ने प्लस हॉटस्टारवर सामना थेट प्रक्षेपित केला जाऊ शकतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube