क्रिकेटनंतर युझवेंद्र चहलचे आणखी एका खेळात पर्दापण! ट्विट करत दिली माहिती

क्रिकेटनंतर युझवेंद्र चहलचे आणखी एका खेळात पर्दापण! ट्विट करत दिली माहिती

Yuzvendra Chahal Chess: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या सुट्टीवर आहे. आयपीएल संपल्यापासून तो सुट्टी एन्जॉय करतोय. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी चहलला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. चहलने वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी आणखी एका खेळात पर्दापण केले आहे. त्याने ग्लोबल चेस लीग जॉइन केली आहे. क्रिकेटसोबतच चहलला बुद्धिबळाचीही आवड आहे आणि संधी मिळाल्यावर त्याचा आनंद घेत असतो. चहल ग्लोबल जेस लीगमध्ये एसजी अल्पाइन वॉरियर्सला सपोर्ट करणार आहे.

युझवेंद्र चहलने एक ट्विट केले आहे. यामध्ये भारताचा सर्वोत्तम युवा बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदही दिसतो आहे. चहलने ट्विट केले की, तो अधिकृतपणे ग्लोबल चेस लीगमध्ये जॉइन केली आहे. युजीने फोटोसोबत कॅप्शन लिहिलं आहे की, “मला कळवताना आनंद होत आहे की, मी अधिकृतपणे स्टील आर्मीला जॉइन झालो आहे. मी एसजी अल्पाइन वॉरियर्सला सपोर्ट करेन.” या फोटोमध्ये चहलसोबत प्रज्ञानंद देखील आहे. भारताचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर अर्जुन इरिगासी, गुकेश डी आणि मॅग्नस कार्लसन यांचाही या संघात समावेश आहे.

सावधान… एलपीजी गॅस आरोग्यासाठी किती सुरक्षित? स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा संशोधन अहवाल

विशेष म्हणजे, भारतीय फिरकी गोलंदाज चहलला चेसची खूप आवड आहे. त्याने अनेक वेळा चेसवरील आपले प्रेम व्यक्त केले आहे. त्याने अनेकवेळा बुद्धिबळ खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, ग्लोबल चेस लीग सध्या एकूण 6 संघांनी यात भाग घेतला आहे. या लीगमध्ये भारतातील खेळाडूंचाही समावेश आहे. केवळ 17 वर्षांचा खेळाडू आर. प्रज्ञानंद यात सहभागी होणार आहेत. विश्वनाथन आनंद देखील या लीगचा एक भाग आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube