- Home »
- Eknath Shinde
Eknath Shinde
ठाकरेंचा अहंकार अन् मुंबईला POK म्हणणाऱ्या कंगनाला भाजपनं यासाठी दिली उमेदवारी!
नवी दिल्ली : भाजपच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करणारी कंगना, विरोधकांना थेट शिंगावर घेणारी कंगना एवढेच नव्हे तर, ‘उद्धव ठाकरे आज मेरा घर टुटा हैं कल तेरा घमंड टुटेगा ये वक्त का पहियाँ हैं याद रखना’ असं थेट आव्हान देणारी कंगना रणावत (Kangana Ranaut) लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. कंगनाला भाजपनं हिमाचल प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे. […]
एका खासदाराचही तिकीट कापणं किती महागात पडू शकतं हेच हेमंत गोडसेंनी दाखवून दिलं…
नाशिक : नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे तसे शांत आणि संयमी समजले जातता. आधी मनसे आणि आता शिवसेना (Shivsena) अशा पक्षांमध्ये काम करुनही गोडसे इतर आमदार-खासदारांप्रमाणे कधी आक्रमक झालेले ऐकीवात नव्हते. गत दोन दिवसांपासून मात्र ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी जाऊन ठिय्या […]
अमरावतीचा तिढा वाढला, राणांच्या उमेदवारीला कडूंचा विरोध; नाराजी दूर करण्यासाठी CM शिंदेंची मध्यस्थी
Bachchu Kadu : महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघावरून तिढा (Amravati Lok Sabha) निर्माण झाला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार नवनीत राणा पुन्हा (Navneet Rana) इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटानेही या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच दोन्ही गटात धुसफूस वाढली आहे. अमरावती मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ किंवा अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी मिळाली नाही तर […]
महायुतीचं जागावाटप फायनल! 48 पैकी 46 मतदारसंघाचा तिढा सुटला, 2 जागांचा तिढा कायम
Mahayuti seat sharing : भाजपने (BJP) राज्यातील 20 लोकसभा उमेदवारांची (Loksabha Election) यादी जाहीर करुन बराच कालावधी उलटला तरी आत्तापर्यत जागावाटपाचा तिढा सुटलेला नव्हता. मात्र, आता महायुतीतील जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. महायुतीच्या 48 पैकी 46 जागा निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, तर 2 जागांवर अद्यापही तिढा कायम आहे. सुप्रियाताईंच्या समर्थनात अजितदादांच्या भावजयी मैदानात; […]
राज ठाकरे यांच्यामार्फत शिंदेंना संपविण्याचा डाव, कोणी आखलाय?
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भेटले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्याने पत्ते पिसण्याचे काम सुरू झाले. लोकसभा निवडणुकीसाठी राज यांना सोबत घेण्यासाठी ही बैठक असल्याचे सांगण्यात आले. पण या भेटीच्या अनुषंगाने अनेक धक्कादायक खुलासे माध्यमांत झळकत आहेत. त्यात तथ्य किती, सत्यता किती याचा कोणी विचारही करायला […]
CM शिंदेंच्या शिवसेनेचे राज ठाकरे पक्षप्रमुख होणार? महायुतीचा धडकी भरवणारा प्रस्ताव
Maharashtra Politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अलीकडेच केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली होती. मनसे शिवसेनेत (shivsena) विलीन करा आणि शिवसेनेची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या, असा प्रस्ताव भाजपकडून राज ठाकरेंना देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. ठाकरे पूर्वी भाजपला सीट विकायचे, आता कॉंग्रेसला सीट विकतात; आमदार […]
काँग्रेसला मोठा धक्का! आमदार राजू पारवे शिंदे गटात, रामटेकमध्ये निवडणूक लढण्याची शक्यता
MLA Raju Parwe Join Shivsena : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आता काँग्रेसचे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पारवे (MLA Raju Parwe) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती […]
तेजसचं राजकीय लाँचिंग जोरावर; ऐन निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे कुठे गायब?
मुंबई : लोकसभेच्या तारखांचं बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे ती म्हणजे जागा वाटपाची आणि ताकद नसलेल्या ठिकाणी प्रदेशिक पक्षांसह युती करण्याची. शिंदेंच्या बंडानंतर वेगळ्या पडलेल्या ठाकरे गटाला आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मैदानात उतरून जंग जंग पिछाडण्याचा चंग बांधला आहे. मात्र, या सर्वांमध्ये प्रकर्षाने खटकणारी म्हणा […]
‘विरार का छोरा’ उत्तर पश्चिम मुंबईच्या रणांगणात; कीर्तीकरांच्या मुलाला देणार टफ
मुंबई : लोकसभा निवडणुकांचं बिगूल वाजल्यानंतर आता अनेक पक्षांचं घोडं अडलं आहे ते म्हणजे जागा वाटपावरून. काही जागांवरून अद्याप महायुतीत एकमत न झाल्याने जागा वाटपांचं भिजत घोंगडं कायम आहे. हा तिढा सोडवण्यात अद्याप यश मिळालेलं नसतानाच उत्तर पश्चिम मुंबईत एकनाथ शिंदेंकडून वेगळीचं चाचपणी सुरू असल्याची चर्चा असून, ‘विरार का छोरा’ ठाकरे गटाचा उमेदवाराला लोकसभेच्या रणांगणात […]
राज ठाकरेंचा तीन जागांवर दावा, ‘नाशिक’च्या मागणीने भाजप-शिंदे सेनेत अस्वस्थता
Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत अजून सहभागी नाही. परंतु, त्या दिशेने आता वेगाने पावले पडू लागली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर काल राज ठाकरे यांची (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावेळी झालेल्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी […]