ज्या भावना गवळींविरोधात भाजपने रान उठवले, आता त्यांच्यासाठीच PM मोदी मागणार मतं…
यवतमाळ : येत्या काहीच दिवसात देशभरात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यात आज (दि.28) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यवतमाळ दौऱ्यावर येत असून, लोकसभा निवडणुकांपूर्वी या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदींच्या दौऱ्याबरोबरच सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhawana Gawali) यांची. दांडगा जनसंपर्क आणि कोणत्याही आव्हानाला थेटपणे भिडण्याची धमक या भावना गवळी यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. गेल्या 20 ते 22 वर्षांच्या काळात भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील पाण्यापासून इतर अनेक समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे शिंदे गट भाजपसोबत येण्यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याच भावना गवळींविरोधात भ्रष्ट्राचाराचे आरोप करत मोठे रान उठवले होते. आत त्याच गवळींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभेसाठी मत मागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Bhavana Gawali Yavatmal Constitusion PM Modi)
Amit Shah : उद्धव ठाकरेंचं स्वागत करणार का? अमित शाहांचं एकाच वाक्यात उत्तर
सोमय्यांनी गंभीर आरोप करत उठवले होते रान
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा विरोधी पक्षातील नेत्यांची भ्रष्ट प्रकरणे बाहेर काढण्यास हातखंडा आहे. शिंदे सरकार भाजपसोबत येण्यापूर्वी याच सोमय्यांनी मविआतील नेत्यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उकरून काढली होती. त्यात खासदार भावना गवळी यांच्यावरदेखील त्यांनी गंभीर आरोप केले होते. विदर्भातील रस्ते विकासच्या कामात त्यावेळचे शिवसेनेतील काही नेते अडथळे निर्माण करत असल्याचे म्हणत गवळी यांनी थोडा थोडका नव्हे तर, 100 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केली होता. त्यावर गवळी यांनी थेट आव्हान देत माझ्यासमोर येत कोणता भ्रष्टाचार झाला आहे ते सिद्ध करावे असे प्रत्युत्तर दिले होते.
PM मोदींसाठी ‘यवतमाळ’ ठरते लकी : सलग तिसऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात
वयाच्या 24 व्या वर्षी राजकारणात प्रवेश
सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेल्या भावना गवळी यांनी 1999 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी लोकसभेत प्रवेश करत देशाच्या राजकारणात प्रवेश केला. माजी खासदार पुंडलिकराव गवळी यांच्याकडून भावना गवळी यांना राजकारणाचे बाळकडून मिळाले. यानंतर 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग पाचवेळा लोकसभा निवडणुकीत विजयाची घोडदौड सुरू ठेवत राजकारणात भक्कम स्थान निर्माण केले.
संजय राठोडही लोकसभेसाठी इच्छूक
एकीकडे नरेंद्र मोदींचा लोकसभेपूर्वीचा यवतमाळ दौरा महत्त्वाचा मानला जात असून, दुसरीकडे याच मतदार संघातील मंत्री संजय राठोड यांनीदेखील 2024 साठी यवतमाळ-वाशिम मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महायुतीचे उमेदवार वरिष्ठ नेते ठरवतील असे सांगत आदेश आल्यास या मतदार संघातून लोकसभा लढवण्यास तयार असल्याचे संकेत राठोड यांनी दिले आहेत.
सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीचं गणित कसं अवघड आहे, हे समजून घ्या!
मै अपनी झांशी नहीं दूंगी….
एकीकडे राठोड यांनी पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. तर, दुसरीकडे भावना गवळी यांनी मै अपनी झांशी नहीं दूंगी असे विधान करत तिकीट आपल्याच मिळेल असा विश्वास दाखवला आहे. प्रत्येकवेळी माझ्या उमेदवारी विरोध झाला. मात्र, मी प्रत्येकवेळी विरोध झुगारून विजयी झाल्याचे गवळी यांनी म्हटले आहे. त्यामुळे मविआकाळात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत रान उठवलेल्या भावना गवळींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यात काय भाष्य करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.