महायुतीला धक्का देणारी आणखी एक बातमी आली आहे. सुरेश नवले यांनी बीड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
80 कोटी लोकांना केंद्र सरकारने मोफत धान्य वाटप केल्याच्या गप्पा आम्हाला सांगू नका. आमचं धान्य का बंद आहे, याचं उत्तर द्या असा जाब या लाभार्थींनी दानवेंना विचारला.
स्थानिक माजी आमदाराच्या नाकर्तेपणामुळे पारनेर तालुक्याचा विकास थांबला असून त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे पारनेरचे कोणतेही प्रश्न सुटले नाहीत.
अजित पवारांनी करड्या शब्दांत कार्यकर्त्यांना चांगलंच दरडावलं. माझ्याबाबतीत जर काही चूक केली तर पुन्हा माझ्या घराची पायरी चढायची नाही असा सज्जड दम भरला.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. या निवडणुकीसाठी त्यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाची निवड केली आहे.
निवडणूक भरारी पथकाकडून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात होता. या तपासणीदरम्यान सोनापूर सिग्नल परिसरात एका वाहनात पैसे सापडले.
दहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे आभार मानते.
महर्षी पंचायतन सिद्धपीठम पीठाधीश्वर अखिल भारतीय संत समिती, धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महंत अनिकेत शास्त्री यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.
गळ्या राज्याची तिकीटे वसंतदादा पाटील यांच्या खिशात असायची. पण आज त्यांच्याच नातवाला तिकीटासाठी दिल्ली, मुंबई, नागपूरचे हेलपाटे घालावे लागत आहेत. या सगळ्या खेळी कुणाच्या आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. ही सगळी खेळी जयंत पाटील यांनीच केली.
शिवसेनेने आतापर्यंत धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, अमरावती आणि परभणी हे चार मतदारसंघ सोडले आहेत.