- Home »
- Lok Sabha Election
Lok Sabha Election
रोहित पवार, युगेंद्र पवारांना सुरक्षा द्या, सुप्रिया सुळेंचं पोलिसांना पत्र; नेमकं कारण काय?
Supriya Sule Letter to Pune Police : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत तर काही उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे. दुसरीकडे प्रचाराने वेग घेतला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार प्रचारासाठी गावोगावी फिरू लागले आहेत. मात्र, आता त्यांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र […]
Sharad Pawar : केजरीवालांच्या अटकेनंतर पवारांचा संताप, म्हणाले, निवडणुका आल्यानंतर…
Sharad Pawar : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) एक पथक काल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानी दाखल झालं होतं. दोन तास केजरीवाल यांची चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. या घटनेनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईवर विरोधी पक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र […]
Lok Sabha Election : बंगाल, बिहार, झारखंड अन् महाराष्ट्र, राजकीय वादाचा फायदा कुणाला ?
Lok Sabha Election : दोन दिवसांआधी उत्तर भारताच्या राजकारणात दोन मोठ्या घडामोडी (Lok Sabha Election) घडल्या. बिहारमधील लोकसभेच्या जागावाटपात केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. दुसरी घडामोड होती झारखंडमधील. झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या सून सीता सोरेन यांनी भाजपाचा […]
‘जगातील लोकप्रिय नेते, १० वर्षांत एकही सुट्टी नाही, मोदींना दैवी शक्ती’; अजितदादांच्या तोंडून कौतुकाचा वर्षाव
Ajit Pawar Praises PM Modi : ‘मी माझ्या जीवनात अनेक राजकीय लोकं पाहिली पण, दहा वर्षांचा काळात एकही सुट्टी न घेणारा पंतप्रधान मोदींसारखा दुसरा नेता पाहिला नाही. जगात भारताची शान वाढविण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. एक काळ असा होता की ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमेरिकेने त्यांना व्हिसा नाकारला होता. परंतु, नंतर असा काही करिश्मा मोदी […]
“राज ठाकरेंना सोबत घेण्याची गरज नाही, त्यांच्यामुळे”.. ‘मनसे’च्या एन्ट्रीआधीच केंद्रीय मंत्र्यांचा वेगळा सूर
Maharashtra Politics : राज ठाकरे महायुतीत येणार का हे अद्याप ठरलेलं नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. त्यानंतर येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल अशी माहिती मनसे नेत्यांनी दिली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांच्या (Raj Thackeray) उपस्थितीत मनसे नेत्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, […]
जागावाटपाचा तिढा सुटणार? ‘मविआ’ची आज मेगा बैठक; मनसेही करणार प्लॅनिंग
Lok Sabha Election Maharashtra : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू (Lok Sabha Election) आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप अजून निश्चित नाही. नेत्यांच्या बैठका सुरू (Maharashtra Politics) आहेत. आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत असून या बैठकीत उमेदवारांची नावं फायनल होतील अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे मनसेचीही आज महत्वाची बैठक होत असून या […]
माढ्यात जानकरांची एन्ट्री! माढा ‘रासप’ला द्या, थेट शरद पवारांकडे मागणी
Mahadev Jankar demand Madha Lok Sabha Constituency : महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाट अजून ठरलेलं नाही. परंतु, महायुतीने माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नक्की केला आहे. भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव होतं. त्यामुळे अकलूजमधील मोहिते गट कमालीचा नाराज झाला आहे. सध्या त्यांनी वेट अँड वॉचचं धोरण घेतलं आहे. तर दुसरीकडे महाविकास […]
राज ठाकरे-अमित शाह भेटीत काय घडलं? फडणवीस म्हणतात, आणखी दोन दिवसानंतर…
Devendra Fadnavis on Raj Thackeray Amit Shah Meeting : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? राज ठाकरेंनी किती जागांची मागणी केली? अमित शाह काय म्हणाले? खरंच मनसे महायुतीत येणार का? असे अनेक […]
Saroj Patil : पवारांच्या बहिणीने सांगितलं बारामतीचं तख्त कोण जिंकणार!
Baramati Lok Sabha Election : राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात होणार आहेत. या सगळ्यात बारामती मतदारसंघातील निवडणूक सर्वाधिक चर्चेत आहे. महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित आहे. तर दुसरीकडे महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. तरीदेखील सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी मिळेल असे निश्चित आहे. यानंतर आता या निवडणुकीत कोण विजयी होईल याच्याही चर्चा […]
‘त्या’ प्रस्तावात बदल शक्य, चर्चा करू; ‘वंचित’ने सोबत यावे एवढीच भूमिका : संजय राऊत
Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीचे जागावाट अजूनही अंतिम झालेले नाही. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत येणार का, याचाही निर्णय अजून झालेला नाही. नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांना (Prakash Ambedkar) पत्र पाठवत काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. वंचित मविआबरोबर राहण्याची शक्यता नाही […]