मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठी बैठक झाली. तब्बल दीड तास ही बैठक सुरू होती.
ज्यांच्या येण्याने पक्षाला फायदा होईल, त्यांचं स्वागतच आहे. पण ज्यांच्यामुळे पक्षाचं नुकसान होईल त्यांना घेतलं जाणार नाही.
इच्छुक उमेदवारांकडून आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. नगर शहरात डझनभर उमेदवार इच्छुकांच्या यादीत दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकांनंतर आता संसदेच्या विशेष अधिवेशनाला कालपासून (दि.24) सुरूवा झाली असून, काल आणि आज नवनिर्वाचित खासदारांच्या शपथ दिली जात आहे.
लोकसभेनंतर अजित पवारांचे अनेक नेते शरद पवारांकडे येण्यासाठी इच्छूक असून, ते केवळ निधी वाटपासाठी हे सर्व थांबले असल्याचे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते.
अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. तसंच जागावाटपही झालेलं नाही. खंरतर मुख्यमंत्री कोण होईल, हा निवडणुकीनंतरचा विषय आहे - अंबादास दानवे
राज्यात पुन्हा काँग्रेसचं सरकार आणायचं. वसंतदादांच्या विचारांचा, सांगली जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं विशाल पाटील म्हणाले.
माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी अखेर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला
भाजपनेच एकनाथ शिंदेंचा गेम केला. शिवसेनेच्या सोबत राहून असं करणं योग्य नाही. ज्या ठिकाणी विरोध होता तिथे उमेदवार बदलला नाही.
लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी टिकण्यासाठी मी दोन पावले मागे आलो, असल्याचं मोठं विधान शरद पवार यांनी केलंय. पवार यांच्या या विधानाची सध्या चर्चा सुरु झालीयं. ते पुण्यात बोलत होते.