ठाकरेंना आणखी एक धक्का! कोल्हापुरातील ‘हा’ बडा नेता करणार भाजपात प्रवेश; मुहूर्तही ठरला

ठाकरेंना आणखी एक धक्का! कोल्हापुरातील ‘हा’ बडा नेता करणार भाजपात प्रवेश; मुहूर्तही ठरला

Maharashtra Politics : राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. त्यानंतर या (Maharashtra Politics) आघाडीतील तिन्ही पक्षांना गळती लागली आहे. सर्वाधिक नुकसान शिवसेना ठाकरे गटाचं झालं आहे. राज्यात महायुती सरकार स्थापन होऊन सहा महिने होत आले तरीही महाविकास आघाडीतील गळती थांबलेली नाही. आताही धक्का देणारी बातमी कोल्हापुरातून आली आहे. कागलचे माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह त्यांचे पुत्र अंबरिशसिंह घाटगे आज भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबईतील पक्ष कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे.

भाजपाने पुढील निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. विरोधी आघाडीतील दिग्गज नेते गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक मतदारसंघात पक्षबांधणी सुरू आहे. कोल्हापुरातील दहाही मतदारसंघात चाचपणी केली जात आहे. तसेच येथील राजकीयदृष्ट्या सक्षम असलेल्या नेत्यांना पक्षात घेतलं जात आहे. या यादीत माजी आमदार संजय घाटगे, अंबरीष घाटगे यांचे नाव जोडले गेले आहे.

संजय काकडेंचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला! विजयादशमीला कमळ सोडून तुतारी फुंकणार

कोल्हापुरातील पिता पुत्र आजच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशानंतर पुढील महिन्यात कागलमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत एक मेळावा होणार आहे. या मेळाव्यातून घाटगे गटाच्या शक्तीप्रदर्शाचे नियोजन आहे. राजकारणात माजी आमदार संजय घाटगे यांनी सहा वेळेस मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध निवडणूक लढली आहे.

यात 1998 मधील पोटनिवडणुकीत घाटगे विजयी झाले होते. यावेळी त्यांना शिवसेनेनं तिकीट दिलं होतं. पण यानंतरच्या निवडणुकीत त्यांना विजय मिळवता आला नाही. मागील वर्षीच्या निवडणुकीत तर त्यांनी अर्ज न भरता थेट मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनाच पाठिंबा दिला होता. यानंतर घाटगे यांना जिल्हा बँकेवर स्वीकृत संचालक म्हणून घेतलं होतं.

कोल्हापूर जिल्ह्यात घाटगे यांचं राजकीय वजन आहे. अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्था, साखर कारखाना या माध्यमातून कागल विधानसभा मतदारसंघात त्यांचा गट आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत घाटगे काय निर्णय घेणार याची उत्सुकता होती. ते लवकरच भाजपात प्रवेश करतील अशीही चर्चा होती. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. काही दिवसांपूर्वी घाटगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना आज मुंबईत पक्ष प्रवेशाचे निमंत्रण दिले आहे.

उबाठाला पुन्हा एकदा दे धक्का, कोल्हापूरमध्ये सुजित मिणचेकरांचा शिवसेनेत प्रवेश

follow us
  • fb
  • instagram
  • youtube