लोकसभेला जास्त जागा निवडून आणण्याची ताकद असतानाही कमी जागा घेतल्या पण विधानसभेला मात्र कमी जागा घेणार नाही, असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी गुरुवारी दिला.
नाशिक आणि दिंडोरीमध्ये काही ठिकाणी कमी मतदान झालं. त्यामुळे गिरीश महाजनांनी बूथनिहाय अहवाल मागवला आहे.
पुणे अपघतातील कारची नोंदणी १८ मार्चला झाली होती परंतु, नोंदणीसह अन्य शुल्क १ हजार ७५८ रुपयांची रक्कम भरली नसल्याने प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीपात्रात एसडीआरएफची बोट उलटली. या दुर्घटनेत तिघा जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. येथे त्याला 14 दिवस रहावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला जर बहुमत मिळालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काय भूमिका असेल याचं उत्तर शरद पवारांनी दिलं.
अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी न्यायालयात माझा नातू वाईट संगतींपासून दूर राहिल आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत करेल अशी हमी दिली. त्यामुळे न्यायालयाने या मुलाला जामीन मंजूर केला.
आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनीही कल्याणीनगर अपघातानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे.
धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
मी गृहविभागाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांचे पासपोर्ट जप्त करावेत.