- Home »
- Pune news
Pune news
मोठी बातमी : कुख्यात गुंड शरद मोहोळवर कोथरूडमध्ये गोळीबार; हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या
पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर (Sharad Mohol) कोथरूड भागात गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा दवाखाना परिसरात असणाऱ्या भागात ही घटना घडली आहे. हा हल्ला टोळीयुद्धतून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांनी मोहळवर तीन गोळ्या झाडल्या असून, मोहळला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर मोहळची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले […]
मी फक्त ढकललं, मारहाण केली नाही; अजितदादांसमोर ‘भाई’ गिरी करणाऱ्या भाजप आमदारांची स्पष्टोक्ती
पुणे : अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याला कानशिलात लगावणाऱ्या भाजप आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) यांनी मी कुणाच्याही कानाखाली लगावली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मी कुणालाही मारहाण केलेली नसून केवळ ढकललं असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे. (Pune BJP MLA Clarification On Sasson Fight Incident) NCP MLA Disqualification : मोठी अपडेट! राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणाचं वेळापत्रक ठरलं काय […]
Video : ससून रूग्णालयात राडा; अजितदादांसमोर भाजप आमदाराची NCP पदाधिकाऱ्याला मारहाण
पुणे : ससून रूग्णालयात मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. भाजप आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) यांनी राष्ट्रवादीच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याच्या कानशिलेत लगावल्याचा प्रकार समोर आला आहे. जितेंद्र सुरेश सातव असे मारहाण केलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. सातव हे राष्ट्रवादी वैद्यकीय पक्षाच्या मदत केंद्राच्या प्रमुख आहेत. ससून रूग्णालयाच्या (Sasson Hospital) उद्धघाटन बोर्डवर नाव नसल्याने कांबळे […]
Ajit Pawar : ‘कशाला खपल्या उकरून काढता?’ आव्हाडांच्या ‘त्या’ विधानावर अजितदादांचं मोजकचं उत्तर
Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या प्रकरणी काल आव्हाड (Ram Mandir) यांनी स्वतः खेद व्यक्त केला होता. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आव्हाड यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी या मुद्द्यावर अधिक […]
पुण्यात ठरणार भाजपच्या ‘महाविजया’ ची रणनीती; 7 जानेवारीला खास बैठक
पुणे : आगामी 2024 च्या लोकसभेत (Loksabha Election 2024) विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजपकडून (BJP) राज्य आणि देशपातळीवर मायक्रो प्लॅनिंग केले जात आहे. तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार असा नारा देत भाजपनं लोकसभेसाठी रणशिंग फुंकले असून, महाविजय 2024 साठीची रणनीती पुण्यात आखली जाणार आहे. येत्या 7 जानेवारी रोजी पुण्यातील बाणेर परिसरात एका खास […]
Pune : गजबजलेल्या रविवार पेठेत दरोडा! 3.32 कोटीचं सोनं अन् लाखोंची रक्कम घेऊन भामटे पसार
Pune News : सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागत केले जात असतानाच (Pune News) पुण्यात मोठा दरोडा पडला. 31 डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी रविवार पेठेतील (Raviwar Peth Area) सराफा दुकान फोडलं. या दुकानातील तब्बल 5 किलो सोने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. दरम्यान, या […]
Chhagan Bhujbal : ‘होय, ओबीसींसाठी 35 वर्षांपासून मला वेड’; भुजबळांनी जरांगेंना ठासून सांगितलं
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj jarange)आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यातील वाद अजूनही कायम आहे. जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली होती. भुजबळला वेड लागलं आहे, असे जरांगे पाटील म्हणाले होते. त्यांच्या याच टिकेवर आज भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले. भुजबळ आज पुण्यात होते. येथे त्यांनी […]
पुणे : नवीन वर्षाचे स्वागत करताना मद्यधुंद तरुणीचा राडा; बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याचा दावा
पुणे : एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने मद्यधुंद अवस्थेत सोसायटीच्या गेटवर जोरदार राडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वानवडी परिसरात काल (31 डिसेंबर) ही घटना घडली आहे. पोलिसांनी (Police) संबंधित मुलीला काही काळ ताब्यात घेतले, मात्र तिच्यावर कोणतीही कारवाई न करता काही वेळात सोडूनही दिले. ती पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्यानेच कोणतीही कारवाई न केल्याच आरोप […]
Pune News : पोलिसांचं यश! लोणी काळभोर येथील टँकर चालकांचा संप टळला
Pune News : केंद्र सरकारकडून हिट अँड रन कायद्याच्या सुधारणेविरोधात (Hit and Run) देशात ट्रक आणि डंपर चालकांनी मोठं आंदोलन सुरू केलं आहे. इंधनाची वाहतूक ठप्प झाल्याने पेट्रोल पंप कोरडे ठाक पडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात पुन्हा अफवाही पसरल्या जात असल्याने पंपांवर वाहनांच्या तुफान गर्दी झाली आहे. हा कायदा चुकीचा असून सरकारने मागे घ्यावा […]
‘अजित पवारांशी बरोबरी करू नका, बारामतीची लोकं हुशार’; मिटकरींचा अमोल कोल्हेंना इशारा
Amol Mitkari replies Amol Kolhe : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरू. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शरद पवार गटाती शेतकरी सन्मान यात्रा सुरू आहे. या यात्रेची सभा बारामत तालुक्यातील काटेवाडीत पार पडली. या सभेत अमोल कोल्हे यांनी अजितदादांवर जोरदार टीका केली. […]
