- Home »
- Pune news
Pune news
Video : गल्लीत कांदे विक्रेत्यांचा आवाज, विद्यार्थ्यांची लगबग अन् मोहोळचा ‘गेम’; CCTV फुटेज आलं समोर
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा काल (दि.5) दुपारी कोथरूडमध्ये खून करण्यात आला. त्याच्या सोबत वावरणाऱ्या साथीदारांनीच त्याच्यावर गोळीबार करत त्याचा शेवट केला. नेमकी मोहळचा खून कसा झाला याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात मोहोळवर अगदी जवळून गोळ्या झाडल्याचे दिसून येत आहे. (Gangster Sharad Mohol Murder CCTV Footage) Video : पत्नीचा फोटो लग्नाच्या […]
Video : पत्नीचा फोटो लग्नाच्या शुभेच्छा अन्…; मोहोळनं हत्येपूर्वी ठेवलेले व्हॉट्सअप स्टेटस व्हायरल
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळचा काल (दि.5) भर दुपारी कोथरूड परिसरातील सुतारदरा भागात खून करण्यात आला. काल मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे तो पत्नी स्वाती मोहोळ यांच्यासोबत गणपतीच्या दर्शनाला जाणार होता. मात्र, त्याआधीच त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर आता मोहोळने हत्यापूर्वी ठेवलेले व्हॉट्सअप स्टेटस समोर आले आहे. यात त्याने पत्नी स्वाती यांचा फोटो ठेवत […]
अजितदादांची मोठी घोषणा; पण पाठ वळताच सचिव म्हणाले ‘त्याची गरजच नाही’
पुणे : ससून रुग्णालयाशेजारी नवीन, सुसज्ज आणि अद्ययावत असे स्वतंत्र कर्करोग (Cancer Hospital) रुग्णालय उभारण्याची जाहीर घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) काल (शुक्रवारी) केली. शिवाय रुग्णालयासाठी ससूनशेजारील जागा मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची जाहीर सूचनाही त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना केली. मात्र, अजितदादांची पाठ वळताच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी या रुग्णालयाची […]
पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण भोवली; भाजप आमदार सुनील कांबळेंविरुद्ध गुन्हा दाखल
Pune News : शहरातील ससून रुग्णालयात नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणे भाजप आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांना चांगलेच महागात पडले आहे. पुणे कँटोन्मेंट (Pune News) विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांच्याविरुद्ध अखेर गुन्ह्याची नोंद झाली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आता आमदार कांबळे यांच्या अडचणी […]
शरद मोहोळ कारागृहात असतानाच बिनविरोध उपसरपंच झाला होता….
Sharad Mohol : लवासा सिटी प्रकरणी दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणाच्या आरोपात कारागृहात असतानाच कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) स्वत:च्या मुठा गावचा उपसरपंच झाला होता. गुन्हेगारी विश्वास नाव मिळवल्यानंतर शरद मोहोळची इतकी दहशत वाढली की त्याच्याविरोधात कोणी बोलायलाही तयार नव्हतं. अशा परिस्थितीतून थेट कारागृहातूनच त्याने गावच्या निवडणुकीचे सुत्र हलवत बिनविरोध उपसरपंच होण्याचा […]
कुख्यात गुंड मोहोळची हत्या कुणी केली ? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट तपासाची दिशाच सांगितली !
Devendra Fadnavis : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्यावर आज (दि. ५ जानेवारी) दिवसाढवळ्या कोथरुडमधये पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या. या घरालगतच्या परिसरातच मोहोळ याच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अज्ञातांनी दुचाकीरवर येत चार राऊंड फायर करत गोळीबार केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गोळीबारानंतर मोहोळ याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात […]
Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळचा ‘गेम’ करणाऱ्या एका आरोपीचे नाव अन् फोटो आला समोर
पुणे : शहरातील कुख्यात गुंड शरद मोहळची आज (दि. 5) कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर खळबळ उडाली असून, आता मोहोळचा गेम करणाऱ्या तीन पैकी एका हल्लेखोराचे नाव समोर आले आहे. मोहोळचा साथीदार असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असे मोहोळवर गोळीबार करणाऱ्या तीनपैकी एका आरोपीचे नाव आहे. पोळेकर याने […]
बोळीतून आले, चार राऊंड फायर अन् पसार; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच हत्या करण्यात आली आहे. घरालगतच्या परिसरातच मोहोळ याच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आलायं. या गोळीबारात अज्ञातांनी दुचाकीवर येत चार राऊंड फायर करत त्याच्यावर गोळीबार केलायं. गोळीबारानंतर जखमी शरद मोहोळवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, मोहोळची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्याचा […]
मोठी बातमी : लग्नाच्या वाढदिवशीच कुख्यात गुंड शरद मोहोळचा पुण्यात खून
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळवर आज (दि.5) दुपारी अज्ञातांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात मोहोळ गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचार सुरु असतानाच शरद मोहोळचा (Sharad Mohol) मृत्यू झाला आहे. आज मोहळच्या लग्नाचा वाढदिवस होता त्याच दिवशी त्याचा खून करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येनंतर पुण्यात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच […]
पत्नी राजकारणात अन् पती कुख्यात गुन्हेगार; शरद मोहोळ गॅंगचा विषय काय?
Sharad Mohol : पुण्यातील कोथरुड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळवर (Sharad Mohol) गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारानंतर जखमी शरद मोहोळवर कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. आता या घटनेनंतर पुण्यात दहशतीचं वलय असलेल्या शरद मोहोळ गॅंगचीच चर्चा सुरु झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सध्या शरद मोहोळ यांच्याच […]
