चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना चालना देणारा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.
जपान काही भारतीय कंपन्यांवर प्रतिबंध टाकण्याची शक्यता आहे. जर असं घडलं तर व्यापारात भारताचे नुकसान होणार आहे.
जगात प्रति व्यक्ती सर्वाधिक वृक्ष कॅनडात आहेत. रिपोर्ट नुसार कॅनडात प्रति व्यक्ती नऊ हजार वृक्ष आहेत.
केनिया सरकारने 2024 या वर्षाच्या अखेरपर्यंत दहा लाख भारतीय कावळ्यांना मारण्याचा (Indian Crow) आदेश जारी केला आहे.
पाण्याची समस्या अनेक देशांत निर्माण झाली आहे. मेक्सिको, तुर्की, ब्रिटन, इजिप्त या देशात पाणी टंचाईचा धोका निर्माण झाला आहे.
आर्थिक संकटांनी हैराण आणि कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानने संरक्षण बजेटमध्ये वाढ करून 2 हजार 122 अब्ज रुपये केले आहे.
नेपाळमध्ये तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. विदेशी कपन्यांना यामध्ये सहभागी होता येईल.
नेपाळ सरकारने भारत अमेरिकेसह अकरा देशांतून त्यांच्या राजदूताना पुन्हा माघारी बोलावले आहे. यामध्ये नेपाळी काँग्रेस कोट्यातून नियुक्त राजदूतांचाही समावेश आहे.
पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात सरकारी वकिलीने सांगितले की पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.
इस्त्रायलने युद्धविरामाचा प्रस्ताव दिल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. त्यानंतर आठ महिन्यांपासूनचं युद्ध थांबेल अस वाटतं आहे